मोबाईलमधील फोटो डिलीट झालेत? फोटो परत मिळू शकतात, पॅनिक होऊ नका !

सायबर सुरक्षा-लेख-क्र-७

मोबाईलमधील फोटो डिलीट झालेत? फोटो परत मिळू शकतात, पॅनिक होऊ नका ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

काही जणांकडून अनावधानाने मोबाईलमधील फोटो (सगळेच किंवा काही) डिलीट होतात. त्यात महत्वाचे फोटो गेल्याने तुम्ही घाबरून जाता, पॅनिक होता. तर असं अजिबात करू नका. ते फोटो रिकव्हर करता येतात. ते कसे करायचे हे अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप माहिती देतो. त्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा. आणि तुमचे फोटो डिलीट झाले नसतील तर चांगलेच आहे पण ही पोस्ट सेव्ह करून ठेवा दुसरीकडे कुठेतरी.... नंतर कदाचित कामाला येऊ शकते. तसेच तुमच्या परिचितांना पाठवून ठेवा. म्हणजे त्यांनाही उपयोग होईल. थोडी दीर्घ पोस्ट आहे पण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे !

तर मंडळी,

१) फोटो डिलीट झाल्याचे समजताच फोनचा वापर लगेच बंद करा

२) नवीन फोटो/व्हिडीओ काढू नका

३) नवीन कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका

(कारण नवीन डेटा सेव्ह झाला, तर डिलीट झालेल्या फोटोची जागा ओव्हरराईट (Overwrite) होते आणि ते फोटो कायमचे नष्ट होतात.)

स्टेप-बाय-स्टेप फोटो रिकव्हरी पद्धती-

स्टेप 1: 'Recently Deleted' किंवा 'Trash' फोल्डर तपासा

बऱ्याच लोकांना हे माहित नसते की फोनमधून डिलीट केलेले फोटो लगेच गायब होत नाहीत. तर त्यासाठी आता फोनमधील Gallery किंवा Photos App उघडा. खाली किंवा बाजूला असलेल्या Albums किंवा Menu (3 रेषा/ठिपके) वर क्लिक करा. तिथे Recently Deleted किंवा Trash / Bin पर्याय शोधा.

डिलीट झालेले फोटो तिथे असल्यास, ते सेलेक्ट करा आणि Restore वर क्लिक करा. झालं काम !

टीप: हे फोटो साधारण ३० ते ६० दिवस इथे सुरक्षित राहतात.

स्टेप 2: Google Photos (बॅकअप) तपासा

अनेक अँड्रॉइड फोनमध्ये Google Photos आपोआप फोटो सिंक करतो. तर आता Google Photos ॲप उघडा. जर फोटो मुख्य स्क्रीनवर दिसत नसतील, तर Collections / Library वर जाऊन Bin / Trash तपासा. फोटो सापडल्यास Restore करा. तसेच photos.google.com वर संगणकावरून लॉग इन करूनही बॅकअप तपासता येतो.

स्टेप 3: थर्ड-पार्टी ॲप्सचा वापर

(जर वरील दोन्ही पद्धती काम करत नसतील तर )

जर गॅलरी आणि ट्रॅशमधूनही फोटो गेले असतील, तर मेमरी स्कॅन करणाऱ्या ॲप्सचा वापर करता येतो.

ॲपद्वारे स्टेप्स (उदा. DiskDigger):

Google Play Store वरून DiskDigger Photo Recovery हे ॲप डाऊनलोड करा. ॲप उघडून "Start basic photo scan" वर क्लिक करा. ॲपला मेमरी स्कॅन करण्याची परवानगी (Permission) द्या. स्कॅनिंग पूर्ण झाल्यावर डिलीट झालेले फोटो स्क्रीनवर दिसू लागतील. हवे असलेले फोटो सेलेक्ट करून Recover वर क्लिक करा आणि ते फोनमध्ये सेव्ह करा.

स्टेप 4: SD कार्ड/मेमरी कार्डमधील फोटो रिकव्हरी (PC द्वारे)

जर फोटो मेमरी कार्डमध्ये (SD Card) होते आणि डिलीट झाले असतील: मेमरी कार्ड फोनमधून काढून Card Reader द्वारे लॅपटॉप/संगणकाला जोडा. कॉम्प्युटरमध्ये Recuva किंवा EaseUS Data Recovery या मोफत सॉफ्टवेअरचा वापर करा. मेमरी कार्ड सेलेक्ट करून Scan करा आणि फोटो रिकव्हर करून कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करा. झालं काम !

लास्ट बट नॉट द लिस्ट :

मुळात मोबाईलमध्ये फोटो जास्त ठेवणे अडचणीचे ठरू शकते. फोन / गॅलरी हॅक करून सायबर भामटे तुमचे फोटो पळवून, त्याला मॉर्फिंग करून तुम्हाला लुटू शकतात. म्हणून शक्यतो गॅलरीमध्ये फोटो जास्त ठेवू नयेत. नियमितपणे ते फोटो पेनड्राइव्ह मध्ये अथवा लॅपटॉप मध्ये उतरवून ठेवले तर जास्त चांगले. त्यामुळे फोटोही सुरक्षित राहतात आणि मोबाईलची मेमरी पण कमी त्रास देत नाही. जेव्हा त्या फोटोची गरज लागेल तेव्हा फक्त मोबाईल त्याला जोडून कॉपी करून घ्यायचे,. थोडा त्रास वाटेल पण सेफ्टीसाठी तितकं केलेलं बरं ! आणि हो.... "फोटो डिलीट झाले म्हणजे ते कायमचे गेले असा अर्थ होत नाही. फोनमध्ये ते फोटो अदृश्य स्वरूपात तसेच असतात, जोपर्यंत तुम्ही नवीन फोटो काढून ती जागा भरत नाही. त्यामुळे फोन बाजूला ठेवा, शांत राहा आणि वरील स्टेप्स फॉलो करा—फोटो परत मिळतील!" - डॉ. धनंजय देशपांडे.(dd)

National level awards ( 3 Times)

State level awards ( 3 Times)

HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

Mentor : Pune University, CANADA & UK

Guest Author for Amrut Maharashtra Portal (State Govt. Dept.)

सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007

सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण गुन्हेगारी विश्वात खळबळ-

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2123

सायबर सुरक्षा-लेख क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2258

सायबर सुरक्षा-लेख-क्र-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2403

सायबर सुरक्षा-लेख-क्र-५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2565

सायबर सुरक्षा-लेख-क्र-६ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

ताणतणावातून येणारा हार्टअटॅक टाळायचाय?..मग ३ मिनिट वेळ काढून वाचा!

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2730

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 11:55 AM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-08-2026 News publication date | Time: 11:55 AM News publication time | Views: 31 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement