मी ही माहिती लिहीत आहे त्यास आधार आहे तो स्व. सखाराम हेळवे यांनी येलमार समाजाविषयी तेराव्या शतकातील लिहलेल्या माहितीचा.

मी ही माहिती लिहीत आहे त्यास आधार आहे तो स्व. सखाराम हेळवे यांनी येलमार समाजाविषयी तेराव्या शतकातील लिहलेल्या माहितीचा.

मी ही माहिती लिहीत आहे त्यास आधार आहे तो स्व. सखाराम हेळवे यांनी येलमार समाजाविषयी तेराव्या शतकातील लिहलेल्या माहितीचा. मुख्य फोटो
मुख्य फोटो

लेखक = रंगनाथ बळवंत येलमार ( नाना कंडरे ) यलमार समाज प्रतिष्ठान संस्थापक मी ही माहिती लिहीत आहे त्यास आधार आहे तो स्व. सखाराम हेळवे यांनी येलमार समाजाविषयी तेराव्या शतकातील लिहलेल्या माहितीचा.

वेगवेगळ्या जातीची व वंशावळीची माहिती लिहणारी एक स्वतंत्र हेळवी नावाची जात आहे, त्यातील सखाराम हेळवी ही एक व्यक्ती इंदोर येथे रहात होती. त्यांचेकडून येलमार समाज्याविषयी लिहलेली थोडीफार माहिती स्व. आमदार रामभाऊ लिंगाडे यांच्या वडिलांचे मूर्तिजापूर येथील चुलते केरूजी गणुजी लिंगाडे यांनी हेळवी यांचेकडून मिळविली,त्यामुळे आपणास काही माहिती मिळाली.

इतर मागास जातीच्या जात पंचायत भरत असत तद्वतच येलमार समाजाची जात पंचायत नेहमी भरून त्यामध्ये आलेल्या समाजातील तक्रारीचा न्याय निवाडा केला जात असे. जातपंच्यायतीचा केंद्रबिंदू हा मंगेवाडी होता. नेहमी तिथेच जात पंचायत भरत असे. कदाचित त्यामुळेच येलमर मंगेवाडी असे नाव पडले असावे, तसे नसते तर येलपले मंगेवाडी असे नाव पडले असते. मी लहान असताना सुद्धा मंगेवाडी येथे जात पंचायत भरत होती त्यामध्ये प्रत्येक गावचे प्रमुख भाग घ्यायचे. त्यातील काही नावे आजही मला आठवतात.

कान्हरवाडीचे दाजी येलमार अनफळेचे महादेव येलमार , मायणीचे शंकर येलमार , बोंबेवाडीचे धोंडिबा विभुते , चोपडीचे हरी चौगुले, अजनाळेचे तात्यासाहेब येलपले व मंगेवाडीचे दादू मंगिडकर बाकीच्या गावातील नावे मला आठवत नाहीत पण जी नावे लिहली त्यांना मी लहानपणी पाहिलेलं सुद्धा आहे.

येलमार समाज मूळ आंध्र प्रदेशातून चारिथार्त साधण्यासाठी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्यातील कोकणखेडे ( हल्लीचे कोकणहळी ) येथे येऊन बहामणी राजवटीत मोहमदिन राजाचे पदरी चाकरी स्वीकारली. येलमार समाज्याचे पाच लोकांनी स्वकर्तत्वावर सरदारकी, काहींनी सुभेदारकी व बाकीच्यांनी सैनिक अशा विविध अधिकारावर नोकऱ्या मिळविल्या.

त्या पाच सरदारांचा विस्तार पुडीलप्रमाणे झाला. 1) सूर्यभानजी येलपले यांचे कुळाचा विस्तार मंगेवाडी, अजनाळे व अनफळे येथे झाला व काहींची आडनावे बदलली तरी तें सर्व भाऊबंदच आहेत. येलपले, मंगिडकर, सोळसे. आजळकर, अंपळकर, व अनफळे येथील येलमार. पडनाव = हिकले, लंगोटे, खलचे व दारबोडे पण हे वरील सर्व भाऊबंद आहेत. 2) चंद्रभानजी करमुडे यांचे कुळाचा विस्तार कान्हरवाडी येथे झाला असून तेथे करमुडे. कंडरे व कान्हरवाडीचे येलमार ही आडनावे असून हे सर्व भाऊबंद आहेत. सध्या करमुडे अजनाळे, माडगूळे व धुळे येथे असून येलमार हे कान्हरवाडी व पंढरपूर तेथे व कंडरे मूर्तिजापूर, माडगूळे, नागपूर व धुळे येथे वास्तव्यास आहेत. 3) वजेभानजी तुंबार यांचे कुळाचा विस्तार मायणी व येड्रॉव येथे झालेला असून तेथे तुंबार, मायणी व येड्रॉवचे पाटील. येड्रॉवकर. येरडावकर, माईणकर व मायणीचे येलमार ही आडनावे आहेत व हे सर्व भाऊबंद आहेत. 4) कुवरपाल विभुते यांचे कुळाचा विस्तार माडगूळे व बोंबीवाडी येथे झाला असून त्यामध्ये विभुते, बोंबीडकर, माडगूळकर लिंगडे व नसले ही आडनावे आहेत.हे सर्व भाऊबंद आहेत. 5) भयनपाळजी तोंडले या कुळाचा विस्तार शेवते येथे झाला असून शेवतकर, तोंडले, येरनाळे,उलभगत, कचोले, भांगे,गुळदगड व शेवतेंचे पाटील ही आडनावे असून हे सर्व भाऊबंद आहेत. इतर काही कुळ्यांचे भाऊबंद 6) आईनवर कुळ आडनाव मेखले 7) बोरले कुळ आडनाव लोकरे, शेंडे व चावरे 8) भंडे कुळ आडनाव भंडिकर, शेगावकर, सुपले, खळगे, रणखांबे, सुपली व शेगावचे येलमार. 9) भूमे कुळ आडनाव बडके, भोसेकर व मंगेवाडीचे चौगुले 10) कोके कुळ आडनाव कोके 11) जांभळे कुळ आडनाव जांभळे 12) गिड्डे कुळ आडनाव गिड्डे 13) गुगले कुळ आडनाव गुगले 14) जरपत कुळ आडनाव कोळवले, वाडकर व खैरे 15) कालवे कुळ आडनाव होळकर,चलपते व माडगूळचे चौगुले. 16) करणवाल कुळ आडनाव चोपडीचे चौगुले. 17) कवाळे कुळ आडनाव विटेकर, सुपली व होळे येथील घाटुले. 18) नरळे कुळ आडनाव नरळे 19) पिसे कुळ आडनाव पिसे 20) सापे कुळ आडनाव गुराडे 21) निपते कुळ आडनाव लाडे, व्हटे, जिरेकर, दुगाणे व महूदचे चौगुले 22) सोमवारे कुळ आडनाव कुरे, अनफळचे चोगुले व मंगेवाडी आणि बोंबेवाडीचे घाटुले 23) खोपडे कुळ आडनाव खोपडे 24) वंगवर कुळ आडनाव वंगवर व बोंबीवाडीचे चौगुले. 25) येदवर कुळ आडनाव येदवर. येलमार समाज्यातील काही जाण कर्नाटकातील नऊ गावामध्ये वास्त्यव्यास राहिली व काहीजनाणी सुमारे सोळाव्या किंवा सतराव्या शतकात महाराष्ट्रात येऊन एकूण पंधरा गावामध्ये वास्त्यव्य केले. पंधरा गावापैकी बारा गावामध्ये पाटीलकी ही पाटिलकीचे आरक्षण सुरु होईपर्यंत येलमार समाज्याकडे होते.मुख्यता प्रत्येक गावामध्ये ज्या सामाज्याची लोकसंख्या जास्त त्याच समाजाकडे पाटीलकी दिली जात असे. अनेक गावामध्ये धनगर पाटील आहेत, अनेक ठिकाणी वंजारी पाटील तर काळी ठिकाणी माळी पाटील आहेत. पाटीलकी हीं उच्च निचतेवर आधारित नव्हती तर ती जातीच्या लोकसंख्येवर आधारित असे. पाटीलकी असणारी गावे 1) कान्हरवाडी 2) अनफळे 3) मायणी 4) बोंबेवाडी 5) माडगूळे 6) मंगेवाडी 7) अजनाळे 8) सुपली 9) भंडीशेगाव 10) शेळवे 11) शेवते 12) येड्रॉव पाटीलकी नसलेली गावे 1) सोमेवाडी 2) चोपडी 3) होळे येलमार समाज्यात एकूण 65 आडनावे होती त्यापैकी भंडिकर, ढाणक, गुळवणी, काळे व खैरे ही नावे सध्या ऐकिवात किंवा कोणाच्या वाचनात येतं नाहीत. बाकी साठ आडनावे नेहमीच्या वापरात आहेत.

आजळकर, अंपळकर, बडके, भांगे, भोसेकर, बोंबीडकर, चलपते, चावरे, चौगुले, दारबाडे, दुगाणे, घाटुले, गिड्डे, गुगले, गुळदगड, गुराडे, हिकले, होळकर, व्हटे, जांभळे, जिरेकर, कचोले, कंडरे, करमुडे, खळगे,खलचे, खोपडे, कोके, कोळवले, कुरे, लाडे, लंगोटे, लिंगडे, लोकरे, माडगूळकर, माईणकर, मंगिडकर,मेखले,मोहरे,नरळे, नसले, पिसे, रणखांबे, शेगावकर, शेवतकर, शेंडे, सोळसे, सुपले, तोंडले, तुंबार, उलभगत, वंगवर, विभुते, वाडकर, विटेकर, येड्रॉवकर, येदवर, येलपले, येरनाळे व येलमार.

येलमार समाजातील करमुडे कुळ सोडून सर्व कुळांचे कुलदैवत खंडोबा आहे व करमुडे कुळाचे कुलदैवत भोजलिंग आहे. करमुडे कुळाचे देवक बहुतेक रुईचे पान असावे असे वाटते, बाकी कुळाचे माहित नाही. समाजातील चालिरीतीचा विचार करता प्रत्येक गावात स्थानिक परिसराचा प्रभाव पडलेला दिसतो त्यामुळे समाजातील गावोगावी वेगवेगळ्या चालीरिती दिसतात.

सुपली येथे पळशी, धोंडेवाडी,भाळवणी व उपरी या गावांच्या प्रभावामुळे लग्नात वीर नाचवला जातो. बाकी कुठेही प्रथा नाही.

शेवते, अनफळे व मायणी येथे अंत्यविधीला जंगमला बोलावून विधी करतात व तिथे विभूतीचा वापर केला जातो बाकी ठिकाणी ही प्रथा नाही.पंधरा गावातील समाज्याच्या प्रमुखांची मिटिंग घेऊन सर्वानुमते एकच प्रथा राबविली जावी अशी अपेक्षा आहे.

भारतात अनेक धर्म आहेत त्यात हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे.हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत. अनेक जातीचं फेडरेशन म्हणजे हिंदू धर्म असं वाटले तें वावगं ठरणार नाही. जाती किती व पोटजाती किती हे कोणालाही सांगता येतं नाही.अनेक नातेवाईकांचा समूह म्हणजे जात.आपली जात म्हणजे जातीच्या समुद्रातील एक थेंब आहे.

आपल्या जातीला जनमानसात व शासन दरबारी योग्य सन्मान मिळावा यासाठी 1927 साली पहिला प्रयत्न झाला. त्यानंतर 1957,1960 व 1984 साली प्रयत्न केले. पण तें प्रयत्न शासनाच्या आरक्षत जातीच्या रेकॉर्डवर जातींचे नाव यावे यासाठी केले.त्यावेळी आरक्षित जातीत आपले नाव नव्हते त्यामुळे आपला समज झाला होता की आपली जात कुठेही नोंदली नाही. हा आपला समज होता. खरी वस्तुस्थिती माहित होती ती धुळ्याचे शंकर अंपळकर, शेगावचे कृष्णा मास्तर, माडगूळचे बळवंत मास्तर. अजनाळेचे करमुडे मास्तर व मंगेवाडीचे प्रा. दामोदर मंगिडकर यांना.त्यामुळे त्यांनी हा प्रश्न वेगळ्या मार्गानी व प्रामाणिकपणे हाताळला पण यश आले नाही.कृष्णा मास्तर यांचे कृतीतून काही अंशी साध्य झाले पण तें मर्यादित स्वरूपात आहे.

आरक्षण बाबत गांभीर्याने विचार केला तर मनाची द्विदा अवस्था होते. आरक्षण हे आर्थिक व सामाजिक स्थितीवर आधारित आहे की जातीवर आधारित आहे. आरक्षण जातीवर आधारित असेल जातीसाठी कोणता निकष लावला. त्या जातीचा आर्थिक दर्जा न पाहता फक्त सामाजिक दर्जा फक्त पाहून आरक्षण द्यायला पाहिजे.

आर्थिक परिस्थितीवर आधारित जर आरक्षण द्यायचे असेल तर तिथे जात हा शब्द यायला नको. त्या काळात आरक्षणासाठी लोकप्रतिनिधीना सुद्धा व्यवस्थित माहित मिळत नव्हती ती सामान्य लोकांना कशी मिळणार त्यामुळे फायदा घेता आला नाही.या शिवाय 1952 साली मद्रास प्रांतात झालेल्या आंदोलनामुळे केंद्र शासनाने काकासाहेब कालेलकर यांचे अध्यक्षतेखाली कालेलकर आयोगाची स्थापना केली. तो आयोगामध्ये येलमार जातीला आरक्षण द्यावे अशी शिफारस होती. अहवाल खूप चांगला होता पण आयोगातील सदस्यांच्या आपसातील मतभेदामुळे तो अहवाल केंद्र शासनाने स्वीकारला नाही. त्या नंतर केंद्र शासनाने 1979 साली मंडल आयोगाची स्थापना करून त्यांच्या शिफारशी मान्य केल्या व मंडल आयोग महाराष्ट्रात 1995 साली लागू केला.

महाराष्ट्र शासनाने 1992 साली आरक्षण विषयी अभ्यास करून शिफारस करण्यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी श्री. मुटाटकर यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व त्या मुटाटकर समितीने येलमार समाजाला आरक्षण द्यावे अशी शिफारस केली होती परंतु नंतर ती शासनाने फेटाळली.

आरक्षण हे मुख्यता जातीवर आधारित असून कोणती जात मागासवर्गीय आहे यांचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर संशोधन व शिक्षण संस्था (बार्टी ) या संस्थेस आहे. कोणती जात इतर मागास वर्गात आहे हे ठरविण्याचा अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगास आहे. आपण मागासवर्गीय आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण बार्टी मार्फत संशोधन समिती स्थापन करून आपले संशोधन करून त्याचे रिपोर्ट बार्टीमार्फत शासनाकडे पाठविले आहेत.पाहू अंतिम निर्णय काय होतोय तें. आरक्षण मिळेल न मिळेल तें आपल्या हाती नाही. पण जे आपल्या हाती आहे तें तरी मनापासून चिकाटीने केले तरी आपला समाज आतापेक्षा जास्त सुधारू शकतो. गावोगावी सहकाराच्या माध्यमातून छोटे मोठे धंदे उभे करून आपण आपल्या जीवनात भरभराटी निर्माण करू शकतो.

इतर समाज्याच्या तुलनेने अल्पावधीत शेतीमध्ये, शिक्षणामध्ये व उद्योगमध्येही प्रचंड झेप घेऊन इतरांपेक्षा खूप पुढे जात आहोत ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. उत्तरोत्तर समाजाची प्रगती होत राहो हीच इच्छा. अनेकांचा गैरसमज असा आहे कि येलमार समाज व येलम समाज तसेच येलमरेड्डी समाज हे एकच आहे परंतु तसा विचार करणे चुकीचे आहे. या तिन्हीही वेगवेगळ्या जाती आहेत.


येलम समाज हा पूर्वीपासून येलमार समाज्यापेक्षा आर्थिकदृष्ठ्या जास्त सक्षम आहे. हल्ली तरुण मुलांनी प्रचंड मेहनत घेऊन हलाखीची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला व त्यात तें यशस्वीहीं होतायेत. यांना आरक्षणाची जोड मिळाली तर येलमार समाज्याचे भवितव्य निश्चित उज्वल होईल. आमच्या चालीरिती, ग्रामदैवत व इतर जातीशी तुलना करता आम्हास मागास वर्गीय समाज्यासाठी असणारे आरक्षण मिळायला हरकत नसावी.


संकलित -

Publisher: रंगनाथ बळवंत येलमार ( नाना कंडरे ) News publisher name | Date: 02-09-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: रंगनाथ बळवंत येलमार ( नाना कंडरे ) News publisher name | Date: 02-09-2026 News publication date | Time: 04:59 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement