उद्योग-व्यवसायाच्या यशामध्ये उत्पादनासोबतच ब्रँडिंग आणि पॅकेजिंगला अनन्यसाधारण महत्त्व

अमृत संस्थेच्या नांदेडमधील प्रशिक्षणवर्गात डॉ. तोष्णीवाल यांचे मार्गदर्शन

उद्योग-व्यवसायाच्या यशामध्ये उत्पादनासोबतच ब्रँडिंग आणि पॅकेजिंगला अनन्यसाधारण महत्त्व मुख्य फोटो
उद्योग-व्यवसायाच्या यशामध्ये उत्पादनासोबतच ब्रँडिंग आणि पॅकेजिंगला अनन्यसाधारण महत्त्व अतिरिक्त फोटो

नांदेड : उद्योग-व्यवसायाच्या यशामध्ये उत्पादनासोबतच ब्रँडिंग आणि पॅकेजिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन डॉ. तोष्णीवाल यांनी केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नांदेडमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणवर्ग (ईडीपी) सध्या सुरू आहे. त्या वर्गात ते बोलत होते. 

डॉ. तोष्णीवाल यांच्या प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे उपस्थित उद्योजक व प्रशिक्षणार्थ्यांना ब्रँड निर्माण प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली. या मार्गदर्शन सत्रात डॉ. तोष्णीवाल यांनी उत्पादनाची ओळख निर्माण करणारे नाव, लोगो, रंगसंगती, आकर्षक व ग्राहकाभिमुख पॅकेजिंग कसे असावे, यावर सविस्तर प्रकाश टाकला. चांगले पॅकेजिंग हे केवळ आकर्षण नसून, ग्राहकाचा विश्वास जिंकण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. 

योग्य ब्रँडिंगमुळे उत्पादनाला बाजारपेठेत वेगळी ओळख मिळते आणि विक्रीत लक्षणीय वाढ होते, असे त्यांनी सांगितले. या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना व्यवसायवृद्धीसाठी नवी दिशा मिळाली. ब्रँडचे नाव ठेवताना ते नाव अर्थपूर्ण असले पाहिजे, तसेच लोगो साधा-वेगळेपणा असलेला-वाचल्यानंतर सहज लक्षात राहणारा असावा याबाबत इत्थंभूत माहिती डॉ. तोष्णीवाल यांनी दिली. यासोबतच उद्योजक कसा असला पाहिजे, व्यवसायाबाबत असलेला अभ्यास, त्याचे राहणीमान, वर्तणूक, जिद्द, मेहनत, चिकाटी, व्यावसायिक कल्पना याबाबतही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, अमृतसखी मनीषा कुनसावळीकर, संजना कुलकर्णी, अमृतमित्र प्रशांत कापसे उपस्थित होते. 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 04:05 PM News publication time | Views: 74 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 04:05 PM News publication time | Views: 74 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words