अमृतच्या योजनांसाठी माजलगावात व्यापक जनजागृती मोहीम; नगरसेवक डॉ. सचिन देशमुख पुढाकार घेणार

सर्व समाजघटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी व्यापक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन

अमृतच्या योजनांसाठी माजलगावात व्यापक जनजागृती मोहीम; नगरसेवक डॉ. सचिन देशमुख पुढाकार घेणार मुख्य फोटो
मुख्य फोटो

माजलगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी व अमृत मित्र सुमितजी धिरडे यांनी माजलगावचे नगरसेवक डॉ. सचिन देशमुख यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान अमृतच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. सचिन देशमुख यांनी अमृतच्या योजनांची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगत, यासाठी मोठी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती देता येईल, तसेच पात्र लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रिया व योजनांच्या लाभासंदर्भात मार्गदर्शन करता येईल. शासनाच्या विविध योजनांची माहिती अनेकदा गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही बाब लक्षात घेऊन अमृतच्या माध्यमातून योजनांविषयी जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न असून, माजलगाव परिसरातील पात्र नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नामुळे अमृतच्या जनजागृती उपक्रमाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 09:31 PM News publication time | Views: 53 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 09:31 PM News publication time | Views: 53 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement