महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ( अमृत ) व आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरात अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ संपन्न

महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेचा ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रम रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरातील संघमित्र सोसायटी, पनवेल येथे” यशस्वी रित्या संपन्न झाला .

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ( अमृत ) व आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरात अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ संपन्न  मुख्य फोटो
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ( अमृत ) व आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरात अमृत पेठ थेट स्वदेशी बाजारपेठ संपन्न  अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र शासनाची "अमृत" ही स्वायत्त संस्था असून तिच्यामार्फत इतर मागासवर्गीय बहुजन विकास कल्याणांतर्गत आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध व्यवसायोत्तेजक प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. नव्याने तयार होणाऱ्या लघु उद्योजकांच्या वस्तूंना विशेष प्रदर्शनासाठी चांगला मंच मिळावा आणि त्यांच्या मालाचा भरपूर खप होण्यासाठी चांगल्या बाजारपेठा मिळाव्यात तसेच जगात सर्वत्र त्यांचे उद्योगव्यवसाय पोहोचावेत, हा अमृतपेठचा मूळ उद्देश आहे. तसेच शासनाच्या अनेक योजनांचा तसेच अनेक प्रशिक्षणांचा त्यांना कसा लाभ घेता येईल, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. अमृतपेठ कार्यक्रमान्तर्गत अमृत संस्थेने दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी “अमृतपेठ थेट बाजारपेठ” चे संघमित्र सोसायटी,पनवेल, जिल्हा रायगड येथे आयोजन केले होते .

सदर बाजारपेठ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली होती. पनवेल अमृत पेठेच्या उद्घाटनासाठी मा. आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील उपस्तीत होते . शहर व उपनगरातील अनेक मान्यवरांनी तसेच नागरिकांनी उस्फूर्तपणे अमृत पेठेत मित्र परिवारासह येऊन खरेदीचा आनंद लुटला.

अमृतपेठ मध्ये स्टॉल धारकांनी घरगुती खाद्यपदार्थ, नवरात्रीच्या दृष्टीने तोरणे, ड्रेस मटेरियल, धार्मिक वस्तू, अनेक प्रकारची घरगुती पिठे, पर्सेस असे अनेकविध स्टॉल लावले होते.

कार्यक्रमानंतर स्टॉल धारक खूप समाधानी होते की त्यांनी आणलेल्या सर्व वस्तू अपेक्षेप्रमाणे विकल्या गेल्या. हेच अलिबाग अमृत पेठेचे यश म्हणता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क: रायगड जिल्हा व्यवस्थापक -9112228759 श्री शैलेश मराठे - 9423892182 कु मंगेश ढेबे - 8149552143 सौ. सुवर्णा तोंडूलकर 9820923312

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 06:13 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 06:13 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement