दीपावली स्पेशल - लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी! २६ /२७/२८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’

स्थानिक उद्योजक व उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेतर्फे लातूर येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दीपावली स्पेशल - लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी! २६ /२७/२८ ऑक्टोबर २०२६ रोजी  ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ मुख्य फोटो
दीपावली स्पेशल - लातूरकरांसाठी खरेदीची पर्वणी! २६ /२७/२८ ऑक्टोबर २०२६ रोजी  ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ अतिरिक्त फोटो

लातूर : स्थानिक उद्योजक व उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने लातूर येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २६ /२७/२८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्पतरू मंगल कार्यालय,औसा रोड, लातूर येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटातील उत्पादक, विक्रेते आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व थेट विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ग्राहक आणि उत्पादक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रदर्शनात कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, ज्वेलरी, विविध हस्तकला व स्वदेशी उत्पादनांचे स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी पाहण्यास व थेट खरेदी करण्याची संधी लातूरकरांना मिळणार आहे.

स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांची थेट उपलब्धता या त्रिसूत्रीवर ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रमाची संकल्पना आधारित आहे. या माध्यमातून लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची संधी मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून लातूरकरांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी व त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारानी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाला भेट

देवून जिल्हा व्यवस्थापकाशी संपर्क साधावा.

संपर्क पत्ता :- पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

संपर्क :- 7391065470 / 9190354294

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, हिंदू विरशैव लिंगायत,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी , भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 19-10-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement