अहिल्यानगरमध्ये अमृत संस्थेअंतर्गत दिवाळी निमित्त अमृतपेठ थेट बाजारपेठ चे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या "अमृत संस्था" व "चिरंजीव प्रतिष्ठान", अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त "अमृत पेठ – थेट बाजारपेठ" चे आयोजन करण्यात आले आहे.
"दर्जेदार खरेदीची खात्री..."अमृत पेठ तुमच्यासाठी..."
होय, आता पुन्हा एकदा खरेदीचा आनंद घेऊया, तोही आपल्या नगरमध्ये भव्य एसी हॉलमध्ये.
लघु-उद्योजकांसाठी
आपली स्वदेशी व दर्जेदार उत्पादने सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणजे अमृत पेठ. उद्योजकांनी आपला स्टॉल बुक करण्यासाठी अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
अमृत पेठची खास वैशिष्ट्ये म्हणजे स्वदेशी व दर्जेदार उत्पादने; यामध्ये दिवाळीसाठी उपयोगी सर्व प्रकारचे साहित्य (आकाशकंदील, पणती इत्यादी), कॉटन बेडशीटसह इतर उत्पादने, आयुर्वेदिक उत्पादने, साड्यांचे अनेक प्रकार व कपडे, हॅन्डमेड वस्तू, अमेरिकन ज्वेलरी व इतर ज्वेलरी, घरगुती पदार्थ (मसाले, पापड, फूड पॅकेट), आर्ट, ज्वेलरी, बॅग, पूजा साहित्य, किड्स वस्तू, स्वादिष्ट खाद्य पदार्थ, दिवाळी निमित्त लागणारा सर्व प्रकारचा दिवाळी फराळ, इन्शुरन्स व सोलर कंपनी स्टॉल, सर्व शासकीय योजनांची माहिती व नोंदणी स्टॉल, आणि नेत्र तपासणी स्टॉल ही असणार आहेत.
दिनांक: २९ ऑक्टोबर व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी.
वेळ: सकाळी ०९:३० ते रात्री ०९:००
स्थळ: हॉटेल द व्हाईट हाऊस, कोहिनूर मॉल जवळ, सावेडी, अहिल्यानगर - ४१४००४
अमृत कार्यालय क्रमांक: ९११२२२८७६९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment