स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्षित गटातील उत्पादक व स्थानिक उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत दि. २४ व २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:०० ते रात्री ०९:०० या वेळेत वैष्णवी मंगल कार्यालय, नांदखेडा रोड, विद्या नगर, परभणी येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’चे आयोजन करण्यात आले आहे. या अमृतपेठ थेट बाजारपेठेच्या माध्यमातून उत्पादक व विक्रेत्यांना विक्रीसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती वस्तू, कलात्मक वस्तू, ज्वेलरी अशा अनेक उत्पादनांचे स्टॉल्स असतील. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रदर्शन व विक्री सकाळी ०९ ते रात्री ०९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजक, उत्पादक व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट द्यावी, लघु उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे व खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी. येथे संपर्क साधावा.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment