लातूरमधील गृहोद्योग करणाऱ्या महिलांना देण्यात आली 'अमृतपेठ'संदर्भात माहिती

लातूरच्या अमृत कार्यालयात झाली बैठक

लातूरमधील गृहोद्योग करणाऱ्या महिलांना देण्यात आली 'अमृतपेठ'संदर्भात माहिती मुख्य फोटो
लातूरमधील गृहोद्योग करणाऱ्या महिलांना देण्यात आली 'अमृतपेठ'संदर्भात माहिती अतिरिक्त फोटो

लातूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील उमेदवारांकरिता विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. लक्ष्यित गटातील उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. लातूरमध्ये अमृतपेठ उपक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी उद्योग करणाऱ्या महिलांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी अमृतसखी कमलाक्षी कुलकर्णी यांनी अमृतपेठसंदर्भात माहिती दिली. अमृत संस्थेच्या अन्य योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी दिली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाड यांनीही विविध योजनांसंदर्भात माहिती दिली. या वेळी सौ. पल्लवी साबळे, गृहोद्योग करणाऱ्या अर्चना कुलकर्णी, सौ. दीपाली कुलकर्णी, सौ. रंजना अलूरकर, सौ. सोनाली मुखेडकर आदी महिला उपस्थित होत्या.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 09:10 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: शुभम सुहासराव मुळजकर News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 09:10 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words