अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे अहिल्यानगर शहराचे आमदार मा.संग्रामभैय्या जगताप यांनी सदिच्छा भेट दिली.अमृत संस्थेच्या योजना व कार्य याविषयी जाणून घेतले.
अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघांचे आमदार मा.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी सदिच्छा भेट दिली. अमृत संस्थेच्या योजना व कार्य याविषयी जाणून घेतले.शहरामध्ये अमृत संस्थेच्या योजना अमृतच्या लक्षित गटापर्यंत अधिक प्रभाविपणे पोहचविण्यासाठी सहकार्य करणार. यावेळी अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी नगरसेवक मा.भैय्या पवार, मा.वैभव आव्हाड, मा.गजूभाऊ भांडवलकर,मा. सुजल झुंजारे व सौ.हेमा झुंजारे आदी उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार व वीरशैव लिंगायत इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment