अमृत संस्थे अंतर्गत अमृत कार्यालय अहिल्यानगर येथे रविवार रोजी एक दिवसीय शासकीय कागदपत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अमृत (महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) हि महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून महाराष्ट्र मध्ये विविध उपक्रम राबवत असते. अमृत संस्थे अंतर्गत अमृत कार्यालय अहिल्यानगर येथे रविवार रोजी एक दिवसीय शासकीय कागदपत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते. अहिल्यानगर मधील महिला,विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी MSRTC NCMC स्मार्ट कार्ड तसेच उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल काढून देण्यासाठी एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.
ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी अनुभवी व शासनमान्य “पूनम डिजिटल सेंटर” यांच्या मदतीने हे कार्ड व दाखले काढण्याची व्यवस्था अमृत संस्था–अहिल्यानगर यांनी केली होती. यामध्ये अनेक महिला/पुरुष व विद्यार्थी यांनी या शिबिराचा फायदा घेतला. अमृत कार्यालय येथे हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. अमृत कार्यालय मध्ये हि सुविधा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार व वीरशैव लिंगायत इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 1 Comments
Satish Mulay
समाजात बऱ्याच तरुणांना अशा काही संस्था शिक्षणा साठी अथवा उद्योग धंदा सुरू करण्यासाठी मदत करतात हेच माहीत नसते.फक्त बँका अथवा जाहिरात करणाऱ्याच्या कडेच ते चौकशी करतात. तेव्हा ज्यांनी ह्या संस्थे ची मदत घेतली, त्यांनी जास्तीत जास्त प्रचार करावा.
Write a Comment