उद्योग, व्यापार आणि स्वदेशी उत्पादनांना मिळणार नवी बाजारपेठ; ५ व ६ सप्टेंबरला कोल्हापूरात दोन दिवसीय विशेष प्रदर्शन
गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), कोल्हापूर यांच्या वतीने उद्योजक, व्यापारी, महिला बचत गट, स्टार्टअप्स, एमएसएमई उद्योग, गृहउद्योग, शेतकरी उत्पादक गट, हस्तकला व कलावंत तसेच विविध व्यावसायिकांना एकाच छताखाली व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘अमृतपेठ २०२६’ या भव्य उद्योग-व्यापार व स्वदेशी उत्पादन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार व रविवार, ५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी हे दोन दिवसीय प्रदर्शन उत्साहात पार पडणार आहे.
गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचा सण. याच भावनेला व्यवसायवृद्धीची जोड देत “गणेशोत्सवाच्या निमित्ताने... व्यवसायाला नवी दिशा, यशाची नवी सुरुवात!” या संकल्पनेतून ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविणे, नव्या ग्राहकांशी संपर्क निर्माण करणे, विक्री वाढविणे, ब्रँडची ओळख निर्माण करणे आणि व्यावसायिक नेटवर्किंगला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
दोन दिवस... अमर्याद संधी! आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात उत्कृष्ट उत्पादन असूनही योग्य ग्राहक, बाजारपेठ आणि प्रसिद्धी मिळणे हे अनेक छोट्या उद्योजकांसमोरील आव्हान असते. हीच गरज लक्षात घेऊन ‘अमृतपेठ २०२६’च्या माध्यमातून विविध व्यवसायांना थेट ग्राहकांशी संपर्क, नवीन ग्राहक व डीलर्स मिळविण्याची संधी, विक्री व ब्रँड प्रमोशन, B2B Networking तसेच आपल्या व्यवसायासाठी विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये उद्योग, महिला बचत गट, स्टार्टअप्स, एमएसएमई उद्योग, गृहउद्योग, शेतकरी उत्पादक गट, हस्तकला व कलावंत, खाद्यपदार्थ उत्पादक तसेच वस्त्र, ज्वेलरी, लाइफस्टाइल, हेल्थ, आयुर्वेद आणि इतर विविध व्यावसायिक सहभागी होऊ शकतात. स्थानिक व्यवसायांना मोठी संधी
‘अमृतपेठ २०२६’ हे केवळ उत्पादन प्रदर्शन नसून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारे, ग्राहक आणि उद्योजकांना एकत्र आणणारे आणि व्यवसायवृद्धीला चालना देणारे व्यासपीठ ठरणार आहे. विशेषतः महिला उद्योजक, गृहउद्योग, नवउद्योजक, स्टार्टअप्स आणि लघुउद्योजकांसाठी हा उपक्रम आपल्या व्यवसायाची ओळख व्यापक करण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. आपल्या व्यवसायाचे उत्पादन थेट ग्राहकांसमोर मांडण्यासोबतच संभाव्य वितरक, व्यापारी आणि व्यावसायिक भागीदारांशी संपर्क साधण्याची संधी सहभागी उद्योजकांना मिळणार आहे. त्यामुळे “नेटवर्क वाढवा... विक्री वाढवा... यशाचा नवा अध्याय सुरू करा!” हा संदेश या प्रदर्शनातून देण्यात येत आहे.
‘पहिले बुकिंग, त्यांनाच पहिले प्राधान्य!’ ‘अमृतपेठ २०२६’साठी स्टॉल बुकिंग सुरू झाले असून ‘First Come – First Preference’ या तत्त्वानुसार स्टॉल आरक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उद्योजकांनी आपल्या व्यवसायासाठी स्टॉल लवकरात लवकर आरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणी आयोजन
हे भव्य प्रदर्शन श्री बाळकृष्ण हवेली ट्रस्ट सांस्कृतिक हॉल, केशव भाई पटेल यात्रेनिवास बिल्डिंग पार्किंग एरिया मध्ये, हॉटेल पाटीलवाडा जवळ, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात खरेदीदार, ग्राहक, व्यापारी आणि उद्योजक यांना एकत्र आणणारे हे प्रदर्शन कोल्हापूरच्या व्यावसायिक क्षेत्रासाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल अशी आशा आहे.
“आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी, नव्या ग्राहकांशी जोडण्यासाठी आणि आपल्या उत्पादनाला नवी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’मध्ये सहभागी व्हा!” असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ९११२२२८७६४ अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६ — गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात व्यवसायवृद्धीची नवी संधी! अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार,हिंदू लिंगायत , वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ संपर्क - जिल्हा कार्यालय कोल्हापूर -९११२२२८७६४ सी एस न २५० / बी १ केव्हीज पार्क ,हॉटेल पाटील वाडा समोर ,नागाळा पार्क ,कोल्हापूर -४१६००३
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment