संभाजीनगर येथे अमृत संस्थेकडून मोफत उद्यम कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर येथे अमृत संस्थेतर्फे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १० दिवसांचे मोफत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात व्यवसाय सुरू करणे, व्यवसायवाढ, विक्री-नफा वाढविणे तसेच डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

संभाजीनगर येथे अमृत संस्थेकडून मोफत उद्यम कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत संस्थेच्या वतीने युवक-युवती व इच्छुक उद्योजकांसाठी १० दिवसांचे मोफत अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण (EDP) आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, चालू व्यवसायाचा विस्तार, विक्री व नफा वाढविण्याचे तंत्र, ग्राहकसंख्या वाढविण्याच्या प्रभावी युक्त्या तसेच डिजिटल व सोशल मीडिया मार्केटिंग याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. व्यवसायातील विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचीही माहिती देण्यात येणार आहे. २४ ते २७ ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने, तर २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

ऑफलाईन प्रशिक्षणाचे ठिकाण अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९ येथे आहे.

सर्व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


संपर्क : 7391065475 / 9403200606

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Manju Kullarni News publisher name | Date: 22-08-2026 News publication date | Time: 06:50 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kullarni News publisher name | Date: 22-08-2026 News publication date | Time: 06:50 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement