अमृतच्या स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजनेस मुदतवाढ; ८०० जागांसाठी २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी), पुणे यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.

अमृतच्या स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजनेस मुदतवाढ; ८०० जागांसाठी २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

मोफत प्रशिक्षण, दरमहा विद्यावेतन, लाखोंचे शासकीय अर्थसहाय्य; UPSC, MPSC, SSC, बँकिंग, TETसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुवर्णसंधी बीड, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी), पुणे यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत पूर्वप्रशिक्षण, विद्यावेतन, आकस्मिक खर्च तसेच प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना आता दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविते. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत एकूण ८०० उमेदवारांची निवड करण्यात येणार असून संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, संयुक्त गट-ब, संयुक्त गट-क, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, कर्मचारी निवड आयोग (SSC), बँकिंग परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तसेच पोलीस व मिलिटरी भरती परीक्षांसाठी पूर्वप्रशिक्षण दिले जाणार आहे.

परीक्षानिहाय जागांमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा (दिल्ली) – ३०, UPSC नागरी सेवा परीक्षा (महाराष्ट्र) – ३०, MPSC राज्यसेवा – १७५, MPSC अभियांत्रिकी सेवा – २५, MPSC न्यायिक सेवा – २५, MPSC संयुक्त गट-ब – १७५, MPSC संयुक्त गट-क – १७५, SSC – २५, बँकिंग – ७०, पोलीस व मिलिटरी भरती – २० आणि TET – ५० अशा एकूण ८०० जागांचा समावेश आहे.

योजनेनुसार प्रशिक्षणाच्या प्रकारानुसार लाभार्थ्यांना दरमहा ₹६,००० ते ₹१३,००० पर्यंत विद्यावेतन, ₹१०,००० ते ₹१८,००० पर्यंत आकस्मिक खर्च, तसेच ₹४०,००० ते ₹२,००,००० पर्यंत प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. UPSC (दिल्ली) प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹१०,००० प्रवास भत्ता देखील देण्यात येणार आहे. संबंधित प्रशिक्षणामध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या उमेदवारांनाच विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे.

अमृतच्या लक्षित गटातील ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी व हिंदू वीरशैव लिंगायत आदी पात्र घटकांतील उमेदवार या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्रता निकष

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. तो खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा जास्त नसावे. संबंधित स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. तसेच यापूर्वी कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेकडून याच स्वरूपाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे

https://amrutcet2026.cbtexam.in/JEST/index.html

CET द्वारे निवड

प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मधील गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. एकूण जागांपैकी ३० टक्के महिला, ५ टक्के दिव्यांग आणि १ टक्का अनाथ उमेदवारांसाठी आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

अर्जास मुदतवाढ

योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, पूर्वीची अंतिम मुदत २३ ऑगस्ट २०२६ होती. उमेदवारांचा प्रतिसाद आणि प्रशासकीय कारणास्तव अर्जास मुदतवाढ देण्यात आली असून आता २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सूचनापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क अमृत मुख्य कार्यालय, पुणे :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),

पाचवा मजला, पीएमआरडीए इमारत, औंध,

पुणे – ४११०६७.

अमृत जिल्हा कार्यालय, बीड :

अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड,

वाघ नेत्रालयाशेजारी, बीड.

७३९१०६५४६८

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर घडवू इच्छिणाऱ्या होतकरू युवक-युवतींसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पात्र उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 23-08-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 1,229 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 23-08-2026 News publication date | Time: 12:56 PM News publication time | Views: 1,229 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement