स्टेट बँकेच्या कर्ज योजनांविषयी मिळणार सविस्तर माहिती
यवतमाळ : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील उमेदवारांमधून उद्योजक घडवण्याच्या उद्देशाने यवतमाळमध्ये १५ फेब्रुवारीला विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) व्यावसायिक कर्ज योजनांची माहिती यात दिली जाणार असून, सौरभ चिवरकर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजना, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्जप्रक्रिया, कर्जमंजुरीचे निकष, तसेच व्यवसायवृद्धीसाठी बँकेकडून मिळणाऱ्या सुविधा याबाबत या वेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून चिवरकर प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे योग्य दिशा दाखवणार आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
दिनांक : १५ फेब्रुवारी २०२५
वेळ : सकाळी ११.०० वाजता
ठिकाण : अमृत जिल्हा कार्यालय
पत्ता :
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी, तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment