सॅटर्डे क्लबच्या बैठकीत मांडण्यात आली अमृत पेठची संकल्पना; व्यापक पातळीवर पोहोचण्यास होणार मदत

नागपूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही व्यावसायिक/उद्योजकांची मोठी संघटना असून, नागपूरमध्ये रविवारी (१४ डिसेंबर) झालेल्या विशेष बैठकीत सहभागी होण्यासाठी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेला खास निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थित उद्योजक, व्यावसायिक आणि स्टार्टअप प्रतिनिधींना अमृत पेठ या व्यवसायासाठीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहिती दिली. सर्वांनी त्याबद्दल उत्सुकतेने जाणून घेतले.

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

नागपूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही व्यावसायिक/उद्योजकांची मोठी संघटना असून, नागपूरमध्ये रविवारी (१४ डिसेंबर) झालेल्या विशेष बैठकीत सहभागी होण्यासाठी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेला खास निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी उपस्थित उद्योजक, व्यावसायिक आणि स्टार्टअप प्रतिनिधींना अमृत पेठ या व्यवसायासाठीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहिती दिली. सर्वांनी त्याबद्दल उत्सुकतेने जाणून घेतले.

अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, जिल्हा उपव्यवस्थापक ओंकार गांधी, अमृतसखी दर्शना जाब्रस, अमृतमित्र प्रतीक आकरे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना सर्व माहिती दिली. या बैठकीला विदर्भातील विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते. अमृत पेठ या संकल्पनेद्वारे स्थानिक उत्पादक, महिला उद्योजक, बचत गट व नवउद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धी, बाजारपेठ उपलब्धता आणि नेटवर्किंगच्या संधी कशा निर्माण होतील, याबाबत अमृत संस्थेकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे अमृत पेठ उपक्रमाला व्यापक व्यावसायिक स्तरावर पोहोचायला मदत मिळणार असून, स्थानिक उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सॅटर्डे क्लब हे उद्योजक, प्रोफेशनल्स आणि स्टार्टअप्स यांचे एकत्रित व्यासपीठ आहे. बिझनेस नेटवर्किंग आणि व्यावसायिक संवादाची संधी त्यातून उपलब्ध होते. त्यात सहभागी सदस्यांना बिझनेस प्रेझेंटेशनची संधी मिळते. त्यामध्ये नेटवर्क विस्तारासाठी व्हिजिटर्स डे उपक्रम असतो. त्यामध्ये अनुभवी उद्योजकांकडून मार्गदर्शन व मेंटॉरशिप मिळते. त्यात सहकार्याच्या संधी उपलब्ध होतात. महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळते आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिझनेस नेटवर्कशी जोडले जाता येते. त्यामुळे अमृत पेठ ही संकल्पनाही जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचायला मदत होईल.

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 15-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words