अमृत संस्थेने केले उद्योग उभारणीपासून कर्जप्रक्रियेपर्यंत सर्वांगीण मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद

अमृत संस्थेने केले उद्योग उभारणीपासून कर्जप्रक्रियेपर्यंत सर्वांगीण मार्गदर्शन मुख्य फोटो
अमृत संस्थेने केले उद्योग उभारणीपासून कर्जप्रक्रियेपर्यंत सर्वांगीण मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) या १० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात २० लाभार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात यशस्वीरीत्या पार पडला.

या प्रशिक्षणामध्ये उद्योजकतेसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी व्यवसाय व उद्योजकतेची ओळख या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर व्यक्तिमत्त्व विकास व व्यवसायाची निवड, व्यवसायासाठी परवाने व नोंदणी, कच्चा माल (गुणवत्ता व खरेदी), आर्थिक नियोजन, ब्रँडिंग व पॅकेजिंग, जाहिरात, विक्री व बाजार व्यवस्थापन, तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी भेट या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. 

प्रशिक्षणामध्ये प्रशांत गणोरकर, स्वप्नील अनचरवाडेकर, अमोल कुलकर्णी, अभिजित धसे, योगेश पाठक, गौरव कुमार कुलकर्णी, प्रसाद पैठणकर या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या दिवशी अमृतपेठ ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणी व बाजार संलग्नता या विषयावर अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी मार्गदर्शन करून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. लाभार्थ्यांना व्यवसाय उभारणीपासून ते यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत येणाऱ्या विविध अडचणींवर कशी मात करावी, व्यवसायातील जोखीम कशी ओळखावी, आर्थिक व बाजारपेठेतील आव्हानांना कशा प्रकारे सामोरे जावे आणि सातत्य, नियोजन व योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा पुढे नेता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रशिक्षणामुळे इच्छुक उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन, नोंदणी प्रक्रिया, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेतील संधी आणि ब्रँडिंग याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृत जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृतमित्र रामेश्वर साळुंके, अमृतसखी मंजू कुलकर्णी, अमृतसखी रुचा शर्मा यांचे सहकार्य लाभले. अमृत संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असून, या प्रशिक्षणामुळे अनेक युवक-युवतींना उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 11:03 AM News publication time | Views: 358 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 11:03 AM News publication time | Views: 358 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words