कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी नुकतीच गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील प्रशांत पुजारी आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली.
कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी नुकतीच गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील प्रशांत पुजारी आणि त्यांच्या पत्नी यांची भेट घेतली. तसेच, त्यांना अमृत या संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्यावर त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रशांत पुजारी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते रत्नागिरी व सिंधुदुर्ग वीज ग्राहक जिल्हा न्यायाधीश, जिल्हा ग्राहक संरक्षण शासकीय परिषद सदस्य, रुग्ण हक्क राज्य समिती विभागीय संयोजक १५ जिल्ह्यांचे प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, कोल्हापूर जिल्हा पोलीस शांतता आणि दक्षता कमिटी सदस्य, विधी प्राधिकरण पीएलव्ही मेंबर, टाइम्स २४ न्यूज चॅनेल भुदरगड तालुका प्रतिनिधी अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. प्रशांत पुजारी यांच्या पत्नी भाजपच्या कार्यकर्त्या आणि तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनीही अमृत संस्थेबद्दलची माहिती ऐकून घेतली. महिलांचे संघटन करून लवकरच महिलांचा प्रशिक्षण कार्यक्रम गारगोटीमध्ये सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment