नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रमात 'अमृत'विषयी देण्यात आली माहिती

मान्यवरांना दिनदर्शिकेचे वितरण

नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रमात 'अमृत'विषयी देण्यात आली माहिती मुख्य फोटो
नांदेडमध्ये 'सकळ सिद्धी गजानन' कार्यक्रमात 'अमृत'विषयी देण्यात आली माहिती अतिरिक्त फोटो

नांदेड : संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त नांदेडच्या श्री शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात 'सकल सिद्धी गजानन' हा विशेष कार्यक्रम झाला. त्या वेळी अमृत संस्थेविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, महानगरपालिका सदस्य आशिष नेरलकर आणि शांभवी साले, नांदेडमधील उद्योजक राम तुप्तेवार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गजानन पिंपरखेडे, प्रसिद्ध संगीतकार सौ. आनंदी विकास आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, अमृतसखी सौ. मनीषा कुनसावळीकर यांनी मान्यवरांना अमृत दिनदर्शिका दिली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 01:22 PM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेव जोशी News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 01:22 PM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words