टायपिंग परीक्षेत यशस्वी झालेल्या देवयानी बैस यांना अमृत संस्थेमुळे शुल्काचा परतावा

कौशल्यप्राप्ती झालीच, शिवाय मिळाला ६५०० रुपयांचा लाभ

टायपिंग परीक्षेत यशस्वी झालेल्या देवयानी बैस यांना अमृत संस्थेमुळे शुल्काचा परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत शासकीय टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फी परतावा देण्याची योजना सुरू आहे.

या योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर येथील देवयानी बैस यांना मिळाला आहे. देवयानी यांनी इंग्रजी टायपिंग (४० शब्दगती) ही शासकीय परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून, त्यांना अमृत संस्थेकडून संबंधित प्रशिक्षण कोर्सचा ६५०० रुपयांचा शुल्कपरतावा देण्यात आला आहे.

अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय सेवांसाठी आवश्यक कौशल्ये व पात्रता मिळण्यास मदत होत असून, त्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होत आहे. अनेक विद्यार्थी या योजनेत सहभागी होऊन कौशल्यविकासाद्वारे उज्ज्वल करिअरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

केदार गोगरकर -9112227635 

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, 

घर क्रमांक 33, आशीर्वाद बिल्डिंग,

विदर्भ हाउसिंग कॉलनी, 

मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,

अमरावती - 444602

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 11:45 AM News publication time | Views: 195 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 11:45 AM News publication time | Views: 195 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words