सांगलीतील ईश्वरपूर येथील अजित रावळ यांना व्याज परतावा योजनेचा मिळाला लाभ

त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली ३६,३९६ रुपये व्याज परताव्याची रक्कम

सांगलीतील ईश्वरपूर येथील अजित रावळ यांना व्याज परतावा योजनेचा  मिळाला लाभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

सांगली: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ किराणा व्यावसायिक अजित रावळ यांना मिळाला आहे. त्यांच्या बँक खात्यावर ३६,३९६ रुपये व्याज परताव्याची रक्कम जमा झाली आहे.

अजित रावळ स्वतःचा किराणा मालाचा व्यवसाय चालवतात. व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि त्याला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. अमृत संस्थेच्या 'कर्ज व्याज परतावा योजने'अंतर्गत त्यांनी रीतसर अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ३६,३९६ रुपयांचा व्याज परतावा मिळाला आहे.

"अमृत संस्थेची ही योजना लक्षित घटकांतील होतकरू तरुणांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या परताव्यामुळे माझ्या किराणा व्यवसायाला आर्थिक हातभार लागला असून व्यवसाय वाढीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे." - अजित रावळ (लाभार्थी)

अमृत संस्थेच्या या योजनेमुळे लहान-मोठे व्यापारी व उद्योजकांना कर्जावरील व्याजाचा भार कमी होण्यास मदत होत असून, अधिकाधिक पात्र नागरिकांनी अमृत संस्थेच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे.


अधिक माहिती साठी संपर्क :

९११२२२८७६६ /७०५७६०७४१९

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)

अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर,

राजवाडा, सांगली ४१६४१६

अमृत संस्थेविषयी : अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी, हिंदू वीरशैव लिंगायत इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

संकेतस्थळ- https://mahaamrut.org.in/

Publisher: गौरी कुलकर्णी News publisher name | Date: 22-10-2026 News publication date | Time: 03:22 PM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: गौरी कुलकर्णी News publisher name | Date: 22-10-2026 News publication date | Time: 03:22 PM News publication time | Views: 11 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement