अमृत’च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा नवउद्योजकांना मोठा आधार; नागपूर येथील आसावरी चांदे यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा

अमृत’ संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून लाभार्थी आसावरी चांदे यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली. सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नवउद्योजकांसाठी ही योजना भक्कम आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत’च्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा नवउद्योजकांना मोठा आधार; नागपूर येथील आसावरी चांदे यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ नवउद्योजकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. नुकतीच या योजनेतील लाभार्थी आसावरी चांदे यांना त्यांच्या बँक खात्यात कर्ज व्याज परताव्याची रक्कम थेट अदा करण्यात आली आहे.

खात्यात व्याजाची रक्कम जमा झाल्यानंतर आसावरी चांदे यांनी अमृत संस्थेचे मनापासून आभार मानले. यावेळी संस्थेच्या या लोककल्याणकारी योजनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "जे नवउद्योजक सुरुवातीच्या काळात असतात, त्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींचा व आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा वेळी भांडवलावरील व्याजाचा भार उद्योगाच्या वाढीत अडथळा ठरतो; मात्र अमृत संस्थेच्या या योजनेमुळे नवउद्योजकांना भरपूर प्रमाणात आर्थिक मदत मिळते आणि कर्जाचा ताण न घेता उद्योग चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी एक भक्कम आधार मिळतो."

अमृत संस्थेमार्फत लक्षित घटकांसाठी राबवली जाणारी ही योजना अत्यंत उपयुक्त व स्तुत्य असून, यामुळे नवउद्योजकांना आर्थिक बळ मिळून ते स्वावलंबी होत आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Aaditya kulkarni News publisher name | Date: 21-10-2026 News publication date | Time: 02:38 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Aaditya kulkarni News publisher name | Date: 21-10-2026 News publication date | Time: 02:38 PM News publication time | Views: 36 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement