नाशिक येथील ‘रिलायबल टुर्स आणि ट्रॅव्हल्स’ या व्यवसायाला मिळाले आर्थिक पाठबळ

नाशिक येथील अद्वैत हिंगे यांना मिळाला व्याज परतावा योजनेचा लाभ.

नाशिक येथील  ‘रिलायबल टुर्स आणि ट्रॅव्हल्स’ या व्यवसायाला मिळाले आर्थिक पाठबळ मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या व्याज परतावा योजनेचा लाभ नाशिक येथील अद्वैत हिंगे यांना मिळाला आहे. अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे त्यांना ₹३९,६०० इतकी रक्कम मिळाली. ते ‘रिलायबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या व्यवसायाद्वारे प्रवास सेवा पुरवण्याचे काम करतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करून तो यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेची माहिती मिळाल्यावर अद्वैत हिंगे यांनी नाशिक जिल्हा कार्यालयात संपर्क करून कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज केला. त्यांनी व्यावसायिक प्रवासी कार घेऊन त्यांच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे आणि त्यांना अमृत कडून व्याज परतावा मिळाल्याने मोठे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्यांनी अमृतचे धन्यवाद मानले.


अशा योजनांमुळे स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळण्यासोबतच उद्योजकांना आपला व्यवसाय अधिक सक्षमपणे विकसित करण्यासाठी मदत होते. अमृत नाशिक जिल्हा कार्यालयाच्या वतीने पात्र युवक-युवतींनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Mayur Hatwalne News publisher name | Date: 22-10-2026 News publication date | Time: 04:04 PM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mayur Hatwalne News publisher name | Date: 22-10-2026 News publication date | Time: 04:04 PM News publication time | Views: 16 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement