सांगली येथे पशुखाद्य निर्मिती व्यवसायाला आर्थिक बळ; व्याज परताव्यामुळे व्यावसायिकाला दिलासा

लक्षित गटातील युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे, या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाची रक्कम परत मिळत असल्याने व्यवसायाच्या आर्थिक नियोजनासाठी मदत होते.

सांगली येथे पशुखाद्य निर्मिती व्यवसायाला आर्थिक बळ; व्याज परताव्यामुळे व्यावसायिकाला दिलासा मुख्य फोटो
सांगली येथे पशुखाद्य निर्मिती व्यवसायाला आर्थिक बळ; व्याज परताव्यामुळे व्यावसायिकाला दिलासा अतिरिक्त फोटो

सांगली, प्रतिनिधी : स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलेल्या देशिंग (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील आनंद धर्मे यांना महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या व्याज परतावा योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत त्यांना एकूण ४९ हजार ७९१ रुपयांची व्याज परताव्याची रक्कम मिळाली आहे. आनंद धर्मे यांचा पशुखाद्य निर्मिती व्यवसाय आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी स्वयंरोजगाराची वाट निवडली आहे. व्यवसायाच्या वाढीसाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत अमृत संस्थेच्या व्याज परतावा योजनेतून मिळालेली रक्कम त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी होण्यास या योजनेमुळे मदत मिळत आहे. लक्षित गटातील युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देणे, या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाची रक्कम परत मिळत असल्याने व्यवसायाच्या आर्थिक नियोजनासाठी मदत होते. आनंद धर्मे यांना मिळालेला व्याज परतावा हा स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या अमृत संस्थेच्या योजनेचा लाभ अधोरेखित करणारा आहे. अशा योजनांमुळे व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळून स्वतःच्या व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. लक्षित गटातील नगरिकांनी अमृतच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालया तर्फे करण्यात येत आहे. *अमृत संस्थेविषयी :-* अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी, हिंदू वीरशैव लिंगायत इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. https://mahaamrut.org.in/ *अधिक माहिती साठी संपर्क : ९११२२२८७६६ /७०५७६०७४१९ महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली ४१६४१६

Publisher: मनोज मिरासदार News publisher name | Date: 21-10-2026 News publication date | Time: 05:22 PM News publication time | Views: 53 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: मनोज मिरासदार News publisher name | Date: 21-10-2026 News publication date | Time: 05:22 PM News publication time | Views: 53 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement