नागपुरात अमृत संस्थेच्या 'ईडीपी' कार्यक्रमाबद्दल वाढतेय उत्सुकता

लँग्वेज जेट इंग्लिश स्पोकन अकॅडमीचे संचालक सुजित कुशवाह यांना देण्यात आली माहिती

नागपुरात अमृत संस्थेच्या 'ईडीपी' कार्यक्रमाबद्दल वाढतेय उत्सुकता मुख्य फोटो
नागपुरात अमृत संस्थेच्या 'ईडीपी' कार्यक्रमाबद्दल वाढतेय उत्सुकता अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती नागपूर येथील लँग्वेज जेट इंग्लिश स्पोकन अकॅडमीचे संचालक सुजित कुशवाह यांना देण्यात आली. अमृत संस्थेचे विविध उपक्रम, योजना, तसेच उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) प्रशिक्षणाविषयी माहिती देण्यात आली. या वेळी अमृतमित्र निखिल देशपांडे व प्रतीक आकरे उपस्थित होते. 

अमृत संस्थेच्या योजनांबाबत माहिती घेतल्यानंतर कुशवाह यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. 'आम्ही शिक्षण घेत असताना अशा प्रकारची योजना उपलब्ध नव्हती. त्या वेळी अशी संधी मिळाली असती तर 'जीसीसी-टीबीसी'सारख्या योजनांचा खूप उपयगो झाला असता,' असे ते म्हणाले.

आपल्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांमध्ये ईडीपी प्रशिक्षणासाठी उत्सुकता असल्याचे त्यांनी नमूद केले आणि लवकरच अमृत संस्थेच्या नागपूर कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांना अमृत कार्यालयाकडून दिनदर्शिका देण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 10:38 AM News publication time | Views: 218 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 10:38 AM News publication time | Views: 218 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words