अमृत संस्थेच्या साह्यामुळे मी आज यशस्वी व्यावसायिक

वैयक्तिक व्याजपरतावा योजनेचे अहिल्यानगरमधील पहिले लाभार्थी सुधीर नगरकर यांची प्रतिक्रिया

अमृत संस्थेच्या साह्यामुळे मी आज यशस्वी व्यावसायिक मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : 'आज मी यशस्वी व्यावसायिक असून, अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे मला योग्य वेळी आर्थिक साह्य मिळाले. त्यामुळे माझ्या वाटचालीला मोठा हातभार लागला,' अशा शब्दांमध्ये सुधीर नगरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात व्यावसायिकांसाठीच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा समावेश आहे. सुधीर नगरकर हे या योजनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले लाभार्थी आहेत. 

अमृतसखी गौरी कुलकर्णी यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन त्यांना अमृत दिनदर्शिका भेट दिली. अमृत संस्थेच्या योजनांबद्दल आणि दिनदर्शिकेबद्दल त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. अमृत संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणार, असेही त्यांनी सांगितले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 10:06 AM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 10:06 AM News publication time | Views: 232 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words