अमृत संस्थेच्या वतीने अमृत सखी दर्शना जाब्रस यांनी संपूर्ण महाबाजार परिसरातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. त्यांनी पन्नाहून अधिक स्टॉलधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
नागपूर : येथील स्वावलंबीनगरमधील गणेश मैदानात आयोजित करण्यात आलेला उद्योजिका मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात १०० होतकरू उद्योजकांनी ‘महाबाजार’मध्ये स्टॉल लावून आपली उत्पादने मांडली. अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नागपूर जिल्हा कार्यालयाचा या प्रदर्शनात स्वतंत्र स्टॉल नव्हता; मात्र अमृत संस्थेच्या वतीने अमृत सखी दर्शना जाब्रस यांनी संपूर्ण महाबाजार परिसरातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. त्यांनी पन्नाहून अधिक स्टॉलधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि अमृत पेठ, प्रशिक्षण योजना, कौशल्य वाढवण्याच्या उपक्रमांबद्दल, तसेच विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.
स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आलेली घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, हँडबॅग, सौंदर्यप्रसाधने या माध्यमातून उद्योजिकांच्या कौशल्याची झलक दिसून येत होती. अमृत सखीच्या मार्गदर्शनामुळे अनेक उद्योजकांना योजनांची नेमकी माहिती मिळाली, तसेच शासकीय योजनांच्या संधींचा अधिकाधिक लाभ कसा घ्यावा, याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमादरम्यान अमृत सखी जाब्रस यांनी २२ ते २५ लाभार्थ्यांशी विशेष संवाद साधून, त्यांच्या व्यवसाय प्रगतीविषयी माहिती घेतली आणि पुढील पावले, योजनांचा लाभ व व्यवसाय विस्ताराबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात नागरिकांसाठी उद्योजकता विकास, कर्ज योजना, कौशल्य विकास, स्टार्टअप मार्गदर्शन, महिला समृद्धी अशा महत्त्वाच्या विषयांवरील थेट माहिती उपलब्ध होती. यासोबतच घरोघरी उपयोगाच्या वस्तूंचा भव्य बाजारही उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अमृत सखीच्या भेटीमुळे उद्योजक व लाभार्थी या दोघांमध्ये जागरूकता वाढली व शासकीय योजनांच्या मदतीने उद्योजकतेच्या संधीचा लाभ घेण्याची शक्यता अधिक बळकट झाली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment