'अमृत'कडून प्रशिक्षण घेऊन फलटणचे वरद जोशी बनले कुशल ड्रोन पायलट

एक रुपयाही खर्च न करता घेता आले दर्जेदार, महागडे प्रशिक्षण

'अमृत'कडून प्रशिक्षण घेऊन फलटणचे वरद जोशी बनले कुशल ड्रोन पायलट मुख्य फोटो
'अमृत'कडून प्रशिक्षण घेऊन फलटणचे वरद जोशी बनले कुशल ड्रोन पायलट अतिरिक्त फोटो

फलटण (सातारा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील वरद जोशी यांनी घेतला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी नवे कौशल्य प्राप्त केले असून, त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये संधींची नवी कवाडे खुली होणार आहेत. 

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेमार्फत युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जातो. रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्रात १६ ते २५ जानेवारी या कालावधीत हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना थिअरीबरोबरच प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. ड्रोन उडवणे, त्यावर नियंत्रण, तसेच सुरक्षितता नियमांबद्दल त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरी विमान वाहतूक संचालनालयाचे (डीजीसीए) नियम, फ्लाइट प्लॅनिंग, इमर्जन्सी हँडलिंग आणि ड्रोन देखभाल याबाबतही सखोल माहिती देण्यात आली. प्रशिक्षकांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले असून, प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, राहण्याची सोय आणि जेवणाची व्यवस्था अत्यंत उत्तम असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रात ड्रोनचा प्रभावी वापर, पीक सर्वेक्षण, फवारणी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग कसा करता येतो याबाबत या वर्गात विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

वरद जोशी यांनी सांगितले, की अमृत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेला हा कोर्स अत्यंत उपयुक्त व माहितीपूर्ण ठरला असून, व्यावसायिक ड्रोन पायलट म्हणून करिअर घडवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अशा प्रकारचे महागडे व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण युवकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांना कौशल्याधारित शिक्षणाची संधी मिळत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती व रोजगार क्षेत्रात नवी दिशा मिळत आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 04:06 PM News publication time | Views: 224 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 04:06 PM News publication time | Views: 224 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words