अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील अथर्व देशपांडे यांना मिळाला अमृत संस्थेच्या योजनेचा लाभ
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत शासकीय टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फी परतावा देण्याची योजना सुरू आहे.
या योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील अथर्व देशपांडे यांना मिळाला आहे. अथर्व यांनी मराठी टायपिंग (३० शब्दगती) ही शासकीय परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून, त्यांना अमृत संस्थेकडून संबंधित प्रशिक्षण कोर्सचा ६५०० रुपयांचा शुल्कपरतावा देण्यात आला आहे.
अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय सेवांसाठी आवश्यक कौशल्ये व पात्रता मिळण्यास मदत होत असून, त्यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होत आहे. अनेक विद्यार्थी या योजनेत सहभागी होऊन कौशल्यविकासाद्वारे उज्ज्वल करिअरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment