जालन्यातील अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रानंतर प्रशिक्षणार्थ्यांची भावना
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या वतीने जालन्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशिक्षक शिरीष देवळे यांनी व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती, विविध शासकीय कार्यालयांशी असलेला व्यवसायाचा संबंध, तसेच बँकिंग क्षेत्रातील अडचणी व उपलब्ध असलेल्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
व्यवसाय सुरू करताना करावी लागणारी नोंदणी प्रक्रिया, परवाने, जीएसटी, उद्यम नोंदणी आदी कागदपत्रांबाबत त्यांनी नेमकी माहिती दिली. तसेच शासकीय यंत्रणांशी समन्वय कसा साधावा, योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि बँकांकडे कर्जप्रस्ताव सादर करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबतही या वेळी माहिती देण्यात आली.
शासकीय कामकाजाबाबतचे गैरसमज व बँकिंग प्रक्रियेविषयी असलेली भीती या सत्रामुळे दूर झाल्याचे मत प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केले. चर्चात्मक पद्धतीमुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी झाल्याचेही म्हणणे त्यांनी मांडले.
या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, तसेच आशीर्वाद कम्प्युटर सेंटरचे संचालक शरद जोशी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
नितीन खेकाळे - 7391065474,9130283058
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी - 9421944752
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment