शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विहामांडवा येथील विद्यार्थ्याला शुल्कपरतावा

अमृत संस्थेच्या योजनेतून मिळाला ५३०० रुपयांचा लाभ

शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विहामांडवा येथील विद्यार्थ्याला शुल्कपरतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध उपयुक्त योजना राबवण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या दिशेने सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमृत संस्थेच्या शासकीय टायपिंग व शॉर्टहँड (जीसीसी-टीबीसी) परीक्षा शुल्कपरतावा योजनेचा लाभ पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील गौरव सुधाकर देशमाने यांना मिळाला आहे. त्यांनी पैठण येथील श्रीनाथ कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूटमधून शॉर्टहँड ६० शब्द प्रति मिनिट ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर अमृत संस्थेकडून त्यांना ५३०० रुपयांचा शुल्कपरतावा देण्यात आला आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेमुळे मोठा आधार मिळत असून, शासकीय सेवांसाठी आवश्यक असलेली पात्रता मिळवण्यास मदत होत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधीही वाढत आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 07:31 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 07:31 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words