शासकीय शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बीडमधील आरतीला मिळाला शुल्कपरतावा

अमृत संस्थेकडून १० हजार ६०० रुपयांचा लाभ मिळाल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

शासकीय शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बीडमधील आरतीला मिळाला शुल्कपरतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. शासकीय टायपिंग-शॉर्टहँड (GCC-TBC) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांना शुल्कपरताव्याच्या रूपाने दिले जाणारे अर्थसाह्य अनेकांसाठी आधार ठरत आहे. याच योजनेअंतर्गत शॉर्टहँड परीक्षेत यशस्वी ठरलेल्या बीडच्या आरती बाळकृष्ण अंदुरकर या विद्यार्थिनीला १० हजार ६०० रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे.

ही रक्कम जमा झाल्यानंतर आरती अंदुरकर हिने अमृत संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयात अमृतसखी मनीषा टाकळकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आर्थिक अडचणी असतानाही शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अमृत संस्थेच्या मदतीमुळे मोठे बळ मिळाल्याची भावना आरतीने या वेळी व्यक्त केली.

आरतीप्रमाणेच बीड जिल्ह्यातील एकूण २३ विद्यार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत टायपिंग व शॉर्टहँड परीक्षांसाठी अर्थसाह्य देण्यात आले आहे. प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अमृत संस्था नेहमीच उभी राहते, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय सेवेसाठी आवश्यक पात्रता मिळत असून त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढत आहेत. अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/




Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 05:25 PM News publication time | Views: 1,290 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 05:25 PM News publication time | Views: 1,290 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words