नागपूरमधील श्री एंटरप्रायझेसला मिळणार 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ

अमृत संस्थेकडून प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आली पाहणी

नागपूरमधील श्री एंटरप्रायझेसला मिळणार 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ मुख्य फोटो
नागपूरमधील श्री एंटरप्रायझेसला मिळणार 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेचा लाभ अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. उद्योगांना साह्य व्हावे म्हणून वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनाही राबवली जाते. नागपूरमधील 'श्री एंटरप्रायझेस - दी इंटीरिअर फॅक्टरी'चे संचालक आनंद देव यांनी या योजनेसाठी नोंदणी करून व्यवसायवृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेमुळे त्यांच्या उद्योगाला आर्थिक हातभार लागणार आहे.

या निमित्ताने अमृत संस्थेचे नागपूर विभागीय उपव्यवस्थापक ओंकार गांधी, तसेच अमृत नागपूर कार्यालयाचे प्रतीक आकरे यांनी 'श्री एंटरप्रायझेस - दी इंटीरिअर फॅक्टरी'ला भेट देऊन कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी उद्योगाच्या भविष्यातील विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच, अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी आनंद देव यांनी नागपूर अमृत कार्यालयासाठी एक छोटे सन्मानचिन्ह भेट म्हणून दिले. त्यांना संस्थेतर्फे अमृत दिनदर्शिका देण्यात आली.

अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता? 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?

वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 03:30 PM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 03:30 PM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words