'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेच्या प्रसारासाठी मिळणार अकोला जनता को-ऑप. बँकेचे सहकार्य

बँकेत घेण्यात आले विशेष माहितीसत्र

'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेच्या प्रसारासाठी मिळणार अकोला जनता को-ऑप. बँकेचे सहकार्य मुख्य फोटो
'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेच्या प्रसारासाठी मिळणार अकोला जनता को-ऑप. बँकेचे सहकार्य अतिरिक्त फोटो

नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचा लाभ अधिकाधिक जणांना देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या नागपूर कार्यालयाने विशेष माहितीसत्राचे आयोजन केले होते. हे सत्र अकोला जनता को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नागपूरमधील गांधीबाग शाखेत घेण्यात आले. 

अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. अमृत संस्थेची वैयक्तिक व्याज परतावा योजना नेमकी काय आहे, तिचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल, तसेच बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना या योजनेचा प्रभावी लाभ कसा देता येईल याबाबतही गद्रे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेच्या गांधीबाग शाखेचे मॅनेजर विजय सिरसाठ यांनी हर्षल गद्रे यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्व बँक कर्मचाऱ्यांसोबत योजनांची माहिती आणि अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या माहितीसत्रामुळे बँक कर्मचाऱ्यांना योजनेची सखोल माहिती मिळाली असून, भविष्यात अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी बँक स्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 04:54 PM News publication time | Views: 122 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 04:54 PM News publication time | Views: 122 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words