प्रशिक्षणार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगवाढीसाठी प्रभावी जाहिरातीचे महत्त्व

परभणीत अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष सत्र

प्रशिक्षणार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगवाढीसाठी प्रभावी जाहिरातीचे महत्त्व मुख्य फोटो
प्रशिक्षणार्थ्यांनी जाणून घेतले उद्योगवाढीसाठी प्रभावी जाहिरातीचे महत्त्व अतिरिक्त फोटो

परभणी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे परभणीमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण (ईडीपी) कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत सातव्या दिवसाच्या सत्रामध्ये जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ आणि देवांश एज्युकेशन टेकचे संस्थापक आणि सीईओ माधव शर्मा यांनी जाहिरात या विषयावर लाभार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत कमीत कमी कालावधीत पोहोचून उत्पादनांची विक्री कशी वाढवता येईल व ग्राहकांना जास्तीत जास्त कसे आकर्षित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. जाहिरातींचे प्रकार आणि जाहिरातीची पटकथा कशी असावी याबाबत प्रात्यक्षिक करण्यास सांगून त्यातील तांत्रिक बाबी व सुधारणा करावयास प्रात्यक्षिकामध्ये हूक (स्वतःच्या व्यवसायाबाबत माहिती) बॉडी (विक्रेत्याबाबत माहिती), सीटीए (कॉल टू अ‍ॅक्शन - विक्रेत्याशी थेट संपर्क साधण्याकरिता) या बाबींसह ३० ते ४० सेकंदांचा आपला व्हिडिओ कसा तयार करावा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या युगात कमी पैशांमध्ये डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व याबाबतही सविस्तर माहिती दिली.

या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृतमित्र अनंतराव जोगदंड, अमृतसखी मयुरी टेळकीकर उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अनिरुद्ध काटे - 7391065473, 9623531601

परभणी जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

रवी कुलकर्णी - 7875105557

परभणी जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 05:24 AM News publication time | Views: 569 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Ravi Kulkarni News publisher name | Date: 07-02-2026 News publication date | Time: 05:24 AM News publication time | Views: 569 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words