प्रशिक्षणामध्ये SMALL + MAPPING SURVEY या विषयाचे प्रात्यक्षिक व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांमध्ये वापर, प्रत्यक्ष हाताळणी तसेच मॅपिंग व सर्व्हेक्षणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे.
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, यांच्या वतीने ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत जालना येथे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० दिवसांचे निवासी ड्रोन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये SMALL + MAPPING SURVEY या विषयाचे प्रात्यक्षिक व व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांमध्ये वापर, प्रत्यक्ष हाताळणी तसेच मॅपिंग व सर्व्हेक्षणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, ड्रोन तंत्रज्ञानातील कौशल्याच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. हे प्रशिक्षण १० दिवसांचे निवासी स्वरूपाचे आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण युवकांसाठी कौशल्य विकासाची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे. इच्छुकांनी प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जालना, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा. संपर्क : ७३९१०६५४७४ वेबसाइट : mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment