लिंगायत समाजाला ‘अमृत’मध्ये समाविष्ट करण्यासाठी कोल्हापूर येथील मा. श्री .प्रशांत शहापुरे यांचा प्रभावी पाठपुरावा ;मंत्रालयाच्या पातळीवर अवघ्या आठवड्यात दखल

महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सातत्याने आवाज उठविणारे शिरोळ तालुक्यातील आलास मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रशांत शहापुरे यांच्यासह पत्रकार श्री.अनिल केरीपाळे यांनी अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देत अमृतच्या विविध योजनांविषयी सविस्तर चर्चा केली.

लिंगायत समाजाला ‘अमृत’मध्ये समाविष्ट करण्यासाठी कोल्हापूर येथील मा. श्री .प्रशांत शहापुरे यांचा प्रभावी पाठपुरावा ;मंत्रालयाच्या पातळीवर अवघ्या आठवड्यात दखल मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सातत्याने आवाज उठविणारे शिरोळ तालुक्यातील आलास मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रशांत शहापुरे यांच्यासह पत्रकार श्री.अनिल केरीपाळे यांनी अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट देत अमृतच्या विविध योजनांविषयी सविस्तर चर्चा केली. लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या गरजू घटकांना शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, या व्यापक उद्देशाने श्री. शहापुरे यांनी अमृतच्या योजनांमध्ये लिंगायत समाजाचा समावेश करण्यासाठी ठाम भूमिका घेऊन समाजाच्या प्रश्नांसाठी केवळ निवेदन देण्यापुरता लढा मर्यादित न ठेवता त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा घेऊन सदर विषयी शासन स्तरावरचा निर्णयाचा आदेश मिळेपर्यंत शासनाच्या उच्चस्तरापर्यंत केला .

लिंगायत समाजाला ‘अमृत’मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसंदर्भात त्यांनी शासन स्तरावर केलेल्या प्रभावी पाठपुराव्याची मंत्रालयाने अवघ्या एका आठवड्यात दखल घेतल्याने त्यांच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजहिताच्या प्रश्नासाठी तातडीने निर्णयप्रक्रियेला चालना मिळावी, यासाठी त्यांनी प्रशासन व शासनाच्या संबंधित स्तरांशी सातत्याने संपर्क ठेवला.याप्रक्रियेमध्ये चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. शिवाजीराव पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यामुळे यासर्वांचे या लक्षित गटातील समाजामध्ये प्रभावी स्थान निर्माण झाले आहे . लिंगायत समाजातील युवक-युवती, विद्यार्थी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षा व कौशल्यविकासाच्या माध्यमातून प्रगती करू इच्छिणाऱ्या घटकांना अमृतच्या योजनांचा लाभ मिळाल्यास त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीला निश्चितच मोठी चालना मिळेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. “समाजातील पात्र घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा व लिंगायत समाजातील युवकांना शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी अमृतच्या माध्यमातून व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात,” अशी अपेक्षा श्री. प्रशांत शहापुरे यांनी अमृतच्या अधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केली.

अमृतच्या योजनांची माहिती अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी समजून घेणे आणि समाजातील गरजू घटकांच्यापर्यंत या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय वाढविण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. श्री. प्रशांत शहापुरे यांच्या या भेटीमध्ये समाजहिताची भूमिका, शासनाच्या योजनांचा लाभ आणि लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यांचा सकारात्मक संगम अधोरेखित झाला .

अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे झालेली ही सदिच्छा भेट सामाजिक बांधिलकी, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि समाजातील पात्र घटकांना शासकीय योजनांच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार,लोहाना ,हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ संपर्क -जिल्हा कार्यालय कोल्हापूर -९११२२२८७६४ सी एस न २५० /बी १ केव्हीज पार्क , हॉटेल पाटिलवाडा समोर ,नागाळा पार्क ,कोल्हापूर -416003

Publisher: श्री .प्रशांत अरुण जोशी News publisher name | Date: 22-08-2026 News publication date | Time: 01:54 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news
Publisher: श्री .प्रशांत अरुण जोशी News publisher name | Date: 22-08-2026 News publication date | Time: 01:54 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: Kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement