नागपूर कार्यालयाला भेट देऊन घेतली माहिती
नागपूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या नागपूर कार्यालयाला उद्योगपती राजन ठवकर यांनी सदिच्छा भेट दिली.
राजन ठवकर हे आरएनआर ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असून, इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे उपाध्यक्ष आहेत. आणखीही अनेक ठिकाणी ते कार्यरत आहेत. श्री. ठवकर सरांना या वेळी अमृत दिनदर्शिका देण्यात आली. अमृत दिनदर्शिकेमधील उपयुक्त माहितीबाबत त्यांनी विशेष प्रशंसा केली. अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या वेळी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांनी राजन ठवकर यांना अमृत संस्थेच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. अमृत संस्थेच्या सामाजिक योगदानाची माहिती जाणून घेऊन त्यांनी संस्थेच्या कामगिरीचे कौतुक केले. या भेटीवेळी हिमांशू शाह (पीएन), तसेच नागपूर विभागाचे उपव्यवस्थापक ओंकार गांधी हेही उपस्थित होते. ही भेट अमृत संस्थेच्या कार्याला नवी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment