अमृत संस्थेच्या योजना समाजाला योग्य दिशा देणाऱ्या

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी यांची बीड जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट

अमृत संस्थेच्या योजना समाजाला योग्य दिशा देणाऱ्या  मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व समाजोपयोगी कार्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.

अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती त्यांना दिली. अमृत संस्थेच्या योजनांचा मुख्य उद्देश समाजातील दुर्लक्षित व लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे हा आहे. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

धनंजय कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले, की 'अमृत संस्थेच्या योजना समाजाला योग्य दिशा देणाऱ्या असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा. अशा उपक्रमांमुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध होतात व विकासाचा मार्ग प्रशस्त होतो. अमृत संस्थेच्या योजनांना मी माझ्या परीने संपूर्ण महाराष्ट्रात नेहमी पाठबळ देत आलो असून, पुढेही विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणार आहे.'

योजनांचा लाभ घेऊन समाजातील कुटुंबे सक्षमपणे उभी राहावीत यासाठी आणखी नवीन योजना, तसेच कर्ज उपलब्धतेसंदर्भात बँकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. अमृत संस्थेच्या उपक्रमांना आपण नेहमीच सकारात्मक पाठबळ देत राहू, असे आश्वासन देऊन समाजाने अमृतच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी संवाद साधताना केले.

धनंजय कुलकर्णी यांच्यासोबत शिवराज मुथळे हेदेखील उपस्थित होते. अमृत बीड जिल्हा कार्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या वेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी, अमृतसखी श्रीमती मनीषा टाकळकर आदी उपस्थित होते. विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीने अमृत संस्थेच्या कामाला बळ मिळत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468

पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय,

अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, 

वाघ नेत्रालयाशेजारी, बीड

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 470 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 470 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words