अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमातून उद्योजकतेचे धडे आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशिक्षणार्थ्याला पहिल्याच दिवशी ६५० रुपयांचा नफा

अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमातून उद्योजकतेचे धडे आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास मुख्य फोटो
अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमातून उद्योजकतेचे धडे आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) हा प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेतर्फे राबवला जात असून, त्या प्रशिक्षणातून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होत आहेत. 

सौ. अश्विनी मकरंद करंजीकर यांनी सहा फेब्रुवारी २०२६ रोजी अमृत संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये स्टॉल लावून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. या स्टॉलच्या माध्यमातून त्यांना दोन ड्रेसेसची ऑर्डर मिळाली असून, त्यातून त्यांना ६५० रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला. पहिल्याच दिवशी मिळालेल्या या प्रतिसादामुळे त्यांना मोठे समाधान आणि आत्मविश्वास मिळाला आहे.

त्यांचा खाद्यपदार्थांशी निगडित व्यवसाय आधीपासूनच सुरू असून, त्या पाणीपुरी, ढोकळे व ढोकळ्याचे पीठ ऑर्डरप्रमाणे तयार करून देतात. अमृत ईडीपी प्रशिक्षणामुळे त्यांना व्यवसाय नियोजन, ग्राहक संपर्क व विक्रीचे प्रत्यक्ष अनुभव मिळत असून, याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यवसायावर होऊन त्यातून उत्पन्नवाढ होत आहे.

अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रम महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी ठरत असून, अश्विनी करंजीकर यांचा यशस्वी अनुभव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 05:15 PM News publication time | Views: 290 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 05:15 PM News publication time | Views: 290 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words