जालन्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणाचा नऊ फेब्रुवारीपासून प्रारंभ

खुल्या प्रवर्गातील तरुणांना सुवर्णसंधी

जालन्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणाचा नऊ फेब्रुवारीपासून प्रारंभ मुख्य फोटो
मुख्य फोटो

जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे जालन्यात अमृत उद्योग कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम नऊ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील युवक-युवती आणि उद्योजकांसाठी स्वयंरोजगार, तसेच आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन व्यवसाय सुरू करणे, तसेच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर यामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योग उभारणीच्या मूलभूत संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण, नफा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग व ट्रेडमार्क नोंदणी यांसह शासकीय योजनांचा उद्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

डिजिटल युगाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना अमृतपेठ या ई-कॉमर्स विक्री माध्यमाची ओळख करून देण्यात येणार असून, त्याद्वारे जालना जिल्ह्यातील लघुउद्योगांची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घेता येणार असून, वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले जालना जिल्ह्यातील पात्र नागरिक या प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

नवीन उद्योग सुरू करू इच्छिणारे युवक-युवती व उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

नितीन खेकाळे - 7391065474,9130283058

जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत

चिंतेश जोशी - 9421944752

जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 06:26 AM News publication time | Views: 363 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 06:26 AM News publication time | Views: 363 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words