छत्रपती संभाजीनगर ब्राह्मण महिला मंचाच्या अध्यक्षा विजयाताई कुलकर्णी यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : 'अमृतपेठ संकल्पना ही महिलांकरिता आणि विशेषतः गृहोद्योग करणाऱ्या महिलांसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाची आहे. त्यांच्या उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृतपेठ संकल्पना अत्यंत प्रभावी ठरेल,' असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर ब्राह्मण महिला मंचाच्या अध्यक्षा विजयाताई कुलकर्णी यांनी केले. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाला त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्या वेळी अमृत कार्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व अमृत दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व विशेषतः अमृतपेठ संकल्पनेची सविस्तर माहिती अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी विजयाताईंना दिली. माहिती जाणून घेतल्यावर विजयाताई कुलकर्णी म्हणाल्या, की 'अमृतपेठ संकल्पना महिलांकरिता आणि विशेषतः गृहोद्योग करणाऱ्या महिलांसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी यशस्विनी उद्योगसमूहाच्या माध्यमातून महिलांचा समूह सांभाळत असून त्या महिला विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृतपेठ ही योजना अत्यंत प्रभावी ठरेल.'
अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. 'गृहोद्योग करणाऱ्या अधिकाधिक महिलांना माझ्या माध्यमातून अमृतपेठ आणि अमृत संस्थेच्या अन्य योजनांशी जोडण्याचे काम मी करणार आहे. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा,' असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला अमृतसखी मंजू कुलकर्णी, ऋचा शर्मादेखील उपस्थित होत्या.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
योगेश भास्करराव रोडे - 9403200606
जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको,
हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment