खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुवर्णसंधी
वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्ष्यित गटातील घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वर्धा शहरात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश पंडितराव खराटे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण, अमृत मोबाइल फिल्म मेकिंग, अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर) प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत असून, यासाठी अनेक लाभार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. अजूनही नावनोंदणी सुरू असून, इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. प्रशिक्षणानंतर स्वयंरोजगार सुरू करता येणार असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अमृत कार्यालयाशी संपर्क साधून या प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी जिल्हा व्यवस्थापक ऋषीकेश पंडितराव खराटे, अमृतमित्र धीरज राठी, अमृतसखी ऋषिका पुरसे यांच्याशी संपर्क साधावा.
मोबाइल : 9112227632
कार्यालय पत्ता : अमृत वर्धा जिल्हा कार्यालय,
प्रशासकीय भवन, तळमजला,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
वर्धा - 442001
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment