शासकीय टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थिनीला १९,५०० रुपये शुल्काचा परतावा

वाशिम जिल्ह्यातील राधिका दंडे यांना मिळाला लाभ

शासकीय टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थिनीला १९,५०० रुपये शुल्काचा परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षा शुल्क परतावा योजनेचा लाभ वाशिम जिल्ह्यातील राधिका दीपक दंडे यांनी घेतला आहे.

राधिका या विद्यार्थिनीने शासकीय संगणक टंकलेखन (जीसीसी-टीबीसी) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी अमृत संस्थेकडे शुल्कपरताव्यासाठी अर्ज सादर केला होता. सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना १९ हजार ५०० रुपये शुल्काची रक्कम त्यांच्या खात्यात परत करण्यात आली आहे. या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या प्रशिक्षणाच्या खर्चाचा ताण कमी झाला असून, पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिलासा मिळाल्याचे राधिका यांनी सांगितले. 

अमृत संस्थेचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी सांगितले, की रोजगारासाठी आवश्यक असलेली संगणकाशी संबंधित व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्यविकास उपक्रम राबवले जातात आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. जीसीसी-टीबीसी, तसेच शॉर्टहँड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी भरलेले शुल्क अर्थसाह्य स्वरूपात परत दिले जाते. वाशिम जिल्ह्यातील लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/




Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-02-2026 News publication date | Time: 04:47 PM News publication time | Views: 541 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 03-02-2026 News publication date | Time: 04:47 PM News publication time | Views: 541 Number of times this news has been viewed | District: washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words