धुळ्यात अमृत संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात

युवक व महिलांना उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याकरिता उपक्रम

धुळ्यात अमृत संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात मुख्य फोटो
धुळ्यात अमृत संस्थेतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात अतिरिक्त फोटो

धुळे : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेचा उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) धुळ्यात उत्साहात सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवक व महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन उद्योजक बनण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये व्यवसाय व उद्योजकतेची संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग नोंदणी प्रक्रिया, उद्योजक नोंदणी (उद्यम) यांसह एफएसएसएआय, जीएसटी नोंदणी, तसेच शासकीय कर्ज व अनुदान योजनांची सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

मृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांनी सांगितले, की 'स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करणे व नवउद्योजक घडवणे हा अमृत संस्थेचा मुख्य उद्देश आहे. धुळे जिल्ह्यातील युवक व महिलांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.'

या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, अमृत संस्थेच्या माध्यमातून अनेक यशस्वी उद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास चंद्रात्रे आणि वैशाली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 04:56 PM News publication time | Views: 163 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 04:56 PM News publication time | Views: 163 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words