लोदगा, जि. लातूर येथील श्री. वसंत कुलकर्णी यांनी अमृत व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलार प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लातूर येथील अमृत कार्यालयास भेट देत सोलार क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन घेतले.
लातूर, दि. २४ : लोदगा, जि. लातूर येथील श्री. वसंत कुलकर्णी यांनी अमृत व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलार प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लातूर येथील अमृत कार्यालयास भेट देत सोलार क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन घेतले. सोलार प्रशिक्षणातून मिळालेले तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि व्यवसायविषयक मार्गदर्शनाच्या आधारे लवकरच सोलार व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे श्री. वसंत कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच अमृत मित्र अमित पांडे उपस्थित होते. सोलार क्षेत्रात वाढणाऱ्या संधींचा लाभ घेत प्रशिक्षणार्थींनी कौशल्याचा उपयोग व्यवसायासाठी करावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. प्रशिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून व्यवसाय आणि व्यवसायातून स्वावलंबन या उद्देशाने अमृतच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment