खामगाव ब्राह्मणसभेत अमृत संस्थेच्या योजनांचा भव्य जागर

समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संधींचा महामेळावा

खामगाव ब्राह्मणसभेत अमृत संस्थेच्या योजनांचा भव्य जागर मुख्य फोटो
मुख्य फोटो

खामगाव (जि. बुलढाणा) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. खामगावमध्ये झालेल्या ब्राह्मण सभेमध्ये शिक्षण, कौशल्यविकास व स्वयंरोजगाराच्या दिशेने समाजाला सक्षम करणाऱ्या अमृत संस्थेच्या विविध योजनांची प्रभावीपणे माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

टायपिंग, शॉर्टहँड परीक्षांच्या शुल्क परतावा योजनेसह, तसेच आयआयटी, एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी यांसारख्या देशातील नामांकित संस्थांसाठी तयारी करून देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. यासोबतच सीडॅक, आयजीटीआर, एनआयईएलआयटी, सिपेट यांसारख्या अत्याधुनिक तांत्रिक प्रशिक्षण योजनांचाही या वेली सविस्तर आढावा घेण्यात आला.

अमृत मोबाइल फिल्म-मेकिंग, ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, अमृत सूर्यमित्र, आयात-निर्यात यांसारख्या भविष्यातील रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या योजनांमुळे युवकांसाठी नवी आर्थिक क्षितिजे खुली होणार असल्याचे कमानी यांनी सांगितले.

स्वयंरोजगार व कौशल्यविकास क्षेत्रातील अ‍ॅडव्हान्स ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, मसाले व्यवसाय, रेक्झिन सेंटर/लेदर वस्तू प्रशिक्षण, ग्राफिक्स डिझायनिंग, डीहायड्रेशन प्रक्रिया प्रशिक्षण आदी व्यवसाय संधींची माहिती देऊन, स्थानिक पातळीवर उद्योजक घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जीईएम पोर्टल, डिजिटल मार्केटिंग, वित्तीय व्यवस्थापन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व लेबलिंग यांसारख्या आधुनिक विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे स्वयंरोजगारासाठी १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर १२ टक्के व्याजाची रक्कम दोन वर्षांसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या व्याजपरतावा योजनेची माहितीही या वेळी देण्यात आली.

या वेळी जिग्नेश कमानी म्हणाले, 'स्वतःचा विकास करतानाच समाजाचा विकास हीच खरी प्रगती आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक युवक, महिला व उद्योजकाने पुढे येऊन संधींचा लाभ घ्यावा.'

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अ‍ॅड. शेखर जोशी होते. ते म्हणाले, की 'अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन शिक्षण, कौशल्य व उद्योजकतेच्या माध्यमातून आपला समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा.'

या कार्यक्रमामुळे खामगावमध्ये ब्राह्मण समाजात शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. या माहितीसत्रामुळे ब्राह्मण समाजातील पुरुष, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना अमृत संस्थेच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. आगामी काळात मोठ्या संख्येने महिला प्रशिक्षणात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :

जिग्नेश कमानी - 9112227637

बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, 

फ्लॅट क्र. 305, तिसरा मजला, 

बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, 

बुलढाणा – 443001

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 02:49 PM News publication time | Views: 684 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 02:49 PM News publication time | Views: 684 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words