‘अमृत’च्या बीड जिल्हा नूतन कार्यालयाला मान्यवरांची सदिच्छा भेट

बीड : अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी आज (पाच डिसेंबर) बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांनी कार्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली. प्रलंबित कामांची माहिती घेऊन त्यांनी जिल्हा चमूशी संवाद साधला आणि सद्य, तसेच आगामी योजनांच्या अंमलबजावणीबद्दल आवश्यक सूचना केल्या. त्यांच्या भेटीमुळे संपूर्ण कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

‘अमृत’च्या बीड जिल्हा नूतन कार्यालयाला मान्यवरांची सदिच्छा भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

बीड : अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी आज (पाच डिसेंबर) बीड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांनी कार्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली. प्रलंबित कामांची माहिती घेऊन त्यांनी जिल्हा चमूशी संवाद साधला आणि सद्य, तसेच आगामी योजनांच्या अंमलबजावणीबद्दल आवश्यक सूचना केल्या. त्यांच्या भेटीमुळे संपूर्ण कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
तहसीलदार (महसूल) नरेंद्र कुलकर्णी आणि सहायक महसूल अधिकारी श्री. खाकरे यांनीही कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अमृतच्या बीड कार्यालयातर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अमृत संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपयुक्त योजनांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. आतापर्यंत संस्थेने केलेल्या कार्याची प्रशंसा करून त्यांनी टीमचे मनोबल वाढवले. भविष्यातही प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे प्रबंधक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी, उपव्यवस्थापक दिगंबर जोशी, तसेच विविध जिल्ह्यांतील जिल्हा व्यवस्थापक आणि अमृत मित्र उपस्थित होते. सर्वांनी मिळून संस्थेची कार्यपद्धती, प्रगती आणि उद्दिष्टांवर चर्चा केली.

अधिक माहितीसाठी संपर्क –
विशाल अशोकराव जोशी, बीड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
मोबाइल : 7391065468, 9421173251
अमृत जिल्हा कार्यालय : अथर्व कॉम्प्लेक्स, पहिला मजला, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड.

अमृत संस्थेविषयी :
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (म्हणजे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्यांसाठी) अमृत ही संस्था विविध प्रकारच्या योजना राबवते. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे.
‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जाती : ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी, इत्यादी.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 05-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words