नवोदित उद्योजक आणि महिलांचा प्रशिक्षण कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद
नाशिक : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे नाशिकमधील राजीवनगर परिसरात ३० जानेवारीला उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला. अमृत संस्थेचे नाशिक विभागाचे व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी नाशिक जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी, अमृतमित्र मयूर हातवळणे, प्राध्यापक पंकज धर्माधिकारी उपस्थित होते.
उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांनाना कौशल्यविकास, विपणन, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसायवृद्धी व व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, विक्री व बाजारपेठ नियोजन इत्यादी विषयांचे धडे दिले जाणार आहेत. प्रशिक्षणाच्या समारोपाच्या दिवशी 'अमृतपेठ'विषयक विशेष सत्राचे आयोजन करण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या सेवा व उत्पादने संकेतस्थळावर नोंदवता येणार आहेत.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
Praktana HarishChandra Joshi
खुप उपयुक्त आहे , जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हायला हवा व खऱ्या गरजवंतांना त्याचा लाभ व्हायला व्हावा असे वाटते
माझ्याकडून वैयक्तिक काही मदत करता आली तर मला नक्की आवडेल ह्या अभियानात योगदान (खारीचा वाटा) उचलायला!🙏
अनिल देविदास चांदवडकर
सुंदर उपक्रम मंगेश खाडिलकर व टीमचे अभिनंदन
Write a Comment