बीड : अमृत या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेच्या बीड येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, या घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी या संस्थेच्या अनेक योजना आहेत.
बीड : अमृत या महाराष्ट्र सरकारच्या स्वायत्त संस्थेच्या बीड येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, या घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी या संस्थेच्या अनेक योजना आहेत.
‘बीड जिल्ह्यातील, तसेच संपूर्ण मराठवाड्यातील अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील कोणीही व्यक्ती बेरोजगार राहू नये, या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल आणि अमृत संस्थेच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करील,’ असे प्रतिपादन विजय जोशी यांनी या वेळी केले. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी विजय जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेष कार्यकारी अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे स्वागत उपव्यवस्थापक दिगंबर जोशी यांनी केले. राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांचे स्वागत अमृतमित्र चिंतेश जोशी आणि सुमित धिरडे यांनी केले. अमृत मुख्यालयातील हृषीकेश उककलकर व प्रणव कुलकर्णी यांच्यासह परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, धाराशिव जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
बीडचे तहसीलदार (महसूल) नरेंद्र कुलकर्णी, सहायक महसूल अधिकारी श्री. खाकरे, ब्राह्मण संघर्ष समितीचे प्रमोद पुसरेकर, परशुराम संस्कार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी, वीर सावरकर प्रतिष्ठानचे डॉ. अजिंक्य पांडव, अॅड. अक्षय भालेराव, डॉ. धनंजय रामदासी, बीबीएनचे समन्वयक डॉ. अनिकेत कुलकर्णी, कर सल्लागार राहुल जाजू, व्यावसायिक संदीप पालसिंगणकर, भालचंद्र कुलकर्णी, सुरेश सारडा आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्याशी सर्व मान्यवरांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवर चर्चा केली. बीड जिल्ह्यात तरुणांसाठी अधिक रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची विनंती मान्यवरांनी श्री. जोशी यांनी केली.
उद्घाटनानंतर कार्यालयाची पाहणी करताना विजय जोशी यांनी कार्यालयातील स्वच्छ, आकर्षक आणि नीटनेटके वातावरण पाहून समाधान व्यक्त केले. अन्नपूर्णा कक्ष, जिल्हा व्यवस्थापक कक्ष, निवास कक्ष, तसेच इतर कार्यालयीन व्यवस्था अत्यंत सुसज्ज असून, ‘बीडचे कार्यालय इतर सर्व जिल्हा कार्यालयांसाठी आदर्श ठरेल,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या नव्या कार्यालयातून अमृत संस्था बीड जिल्ह्यातील तरुणांना, समाजाला आणि ‘अमृत’च्या लक्ष्यित गटाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सहकार्य करू शकणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
विशाल अशोकराव जोशी, बीड जिल्हा व्यवस्थापक, अमृत
मोबाइल : 7391065468, 9421173251
अमृत जिल्हा कार्यालय : अथर्व कॉम्प्लेक्स, पहिला मजला, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड.
अमृत संस्थेविषयी :
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (म्हणजे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्यांसाठी) अमृत ही संस्था विविध प्रकारच्या योजना राबवते.
‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जाती : ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी, इत्यादी.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment